योजना

Ladki Bahin Yojana | आनंदाची बातमी! ‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; तुमच्या खात्यात आले का?

Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने दिलेला शब्द पाळला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री आणि महायुतीने लाडक्या बहिणींच्या (Ladki Bahin Yojana) खात्यात २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती. यावरून काही वेळा चर्चा व वादावादी निर्माण झाली होती, पण आता सरकारने हा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करायला सुरुवात केली आहे. जानेवारी महिन्याच्या हप्त्याची रक्कम अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात २४ जानेवारीपासून जमा होऊ लागली आहे, तर उर्वरित लाभार्थ्यांना येत्या दोन दिवसांत हप्ता मिळेल. (लाडकी बहिण योजना हप्ता)

महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात


महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर खात्यात पैसे जमा करण्याची ग्वाही दिली होती. या ग्वाहीनुसार, पैसे खात्यात जमा होण्यास विलंब झाला, पण अखेर २४ जानेवारीपासून पात्र महिलांच्या खात्यात रक्कम जमा केली जात आहे. या योजनेचा फायदा महिलांना थेट बँक हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने मिळत आहे. जर तुम्हाला पैसे खात्यात आले आहेत का हे तपासायचं असेल, तर तुमच्या मोबाईलवर बँक कडून मेसेज येईल. तसेच, बँकेच्या अॅपमधून किंवा बँकेत जाऊन तुम्ही खात्यात जमा झालेली रक्कम तपासू शकता.

वाचा: व्यंगचित्रकार ते लाडके हिंदुहृदयसम्राट! तुम्हाला बाळासाहेबांबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?

लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढणार


सध्या, प्रत्येक पात्र लाभार्थीच्या खात्यात १५०० रुपये जमा होत आहेत. त्याचबरोबर, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, पुढील काळात लाडकी बहीण योजनेतील हप्त्याची रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याची शिफारस करण्यात येणार आहे. या शिफारसीनंतर, अर्थसंकल्पीय अधिवेशनात योजनेच्या खर्चासाठी आवश्यक तरतूद केली जाईल. त्यामुळे या वाढीव हप्त्याबाबत लवकरच अधिक माहिती मिळेल. लाडकी बहीण योजनेचा फायदा विशेषत: गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना होतो, ज्यामुळे त्यांना आर्थिक साहाय्य मिळते. सरकारने दिलेल्या या मदतीमुळे महिलांच्या जीवनात काही प्रमाणात सुधारणा होण्याची आशा आहे.

हेही वाचा:

जळगावात धावत्या ट्रेनमध्ये ठिणग्या? पाहताचं प्रवाशांनी धडाधड मारल्या उड्या; ११ जणांचा जागीच चिरडून मृत्यू 

शुभ योग तयार फळ ‘या’ चार राशींना अचानक लाभ, जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button