योजना

Mini tractor Anudan | मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी 90 टक्के  अनुदानावर अर्ज प्रक्रिया सुरू, शेतकऱ्यांनो जाणून घ्या कसा करावा अर्ज?

Mini Tractor Anudan | अनुसूचित जाती आणि नव बौद्ध समाजातील बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत 90 टक्के अनुदानाची सुविधा उपलब्ध आहे. राज्य सरकारने 2017 मध्ये जाहीर केलेल्या गाइडलाइन्सनुसार, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थ्यांना 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करण्याची संधी दिली आहे. (Mini tractor Anudan)

मिनी ट्रॅक्टर योजना काय आहे?  What is the mini tractor scheme?


मिनी ट्रॅक्टर योजनेचा मुख्य उद्देश अनुसूचित जाती आणि नव बौद्ध समाजातील बचत गटांना कृषी क्षेत्रात मदत करण्यासाठी ट्रॅक्टर आणि त्याच्या उपसाधनांचा पुरवठा करणे आहे. यासाठी प्रकल्प खर्च 3.5 लाख रुपये मानले गेले असून, सरकार 3 लाख 15 हजार रुपयांचे अनुदान देणार आहे. यामध्ये ट्रॅक्टर आणि त्याच्या उपसाधनांची खरेदी करण्यात येईल. ( मिनी ट्रॅक्टर अनुदान)

मिनी ट्रॅक्टर अनुदानसाठी अर्ज कसा करावा? How to apply for a mini tractor subsidy?


या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुकांनी https://mini.mahasamajkalyan.in/register.aspx या संकेतस्थळावर जाऊन त्यांचे अर्ज दाखल करावे. अर्ज दाखल केल्यानंतर अर्जाची छायाप्रत आणि आवश्यक कागदपत्रे संबंधित समाज कल्याण कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.

मिनी ट्रॅक्टर योजना पात्रता | Mini Tractor Scheme Eligibility


योजना अर्जदारांसाठी काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती आहेत. अर्ज करणारे व्यक्ती किंवा बचत गटाचे सदस्य महाराष्ट्र राज्याचे निवासी असावे लागतील. तसेच, स्वयंसहायता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील असावे, आणि अध्यक्ष किंवा सचिव हा देखील अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा.

वाचा: व्यंगचित्रकार ते लाडके हिंदुहृदयसम्राट! तुम्हाला बाळासाहेबांबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?

जर अर्जांची संख्या निर्धारित लक्ष्यापेक्षा जास्त झाली, तर तर बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल. योजनेचा लाभ घेत असलेल्या गटांना ट्रॅक्टर व उपसाधनांच्या खरेदीसाठी 3 लाख 15 हजार रुपयांचे शासकीय अनुदान दिले जाईल. ही योजना कृषी आणि ग्रामीण विकासास प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे संबंधित समुदायांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत आणिन त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल.

हेही वाचा:

जळगावात धावत्या ट्रेनमध्ये ठिणग्या? पाहताचं प्रवाशांनी धडाधड मारल्या उड्या; ११ जणांचा जागीच चिरडून मृत्यू 

शुभ योग तयार फळ ‘या’ चार राशींना अचानक लाभ, जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button