योजना
ट्रेंडिंग

Agriculture Scheme | शेतकऱ्यांसाठी गूडन्यूज! आता शेतकऱ्यांना प्रत्येकी मिळणार 10 हजार रुपये, जाणून घ्या सविस्तर

Agriculture Scheme | 2025 च्या केंद्रीय अर्थसंकल्पावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थसंकल्पाची घोषणा करणार आहेत. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी (Agriculture Scheme) मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. यामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या रकमेची वाढ होण्याचा अंदाज आहे. सध्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये आर्थिक (Economic) मदत दिली जाते, परंतु आगामी अर्थसंकल्पात ही रक्कम 10000 रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते. (Sheti Yojana)

पिएम किसान योजना


महागाईच्या वाढत्या प्रचंड दबावामुळे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या 6000 रुपयांमध्ये पुरेशी मदत होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. विविध तज्ञांचे मत आहे की, पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत रक्कम वाढवली तर शेतकऱ्यांना शेतीमध्ये (Agriculture ) सुधारणा करण्यासाठी आवश्यक असलेली गुंतवणूक करणे सोपे होईल. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था देखील मजबूत होईल. (कृषी योजना)

शेतकऱ्यांना मिळणार 10 हजार रुपये?


केंद्रीय सरकारच्या या नव्या प्रस्तावानुसार, पीएम किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम 6000 रुपयांवरून 10000 रुपये करण्याचा विचार केला जात आहे. मात्र, यावर अंतिम निर्णय अद्याप घेतला गेलेला नाही. सरकारने या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाकडे शेतकरी वर्गाचं लक्ष लागून राहिलं आहे.

जर पीएम किसान योजनेतील रक्कम वाढली तर शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल. या रकमेचा वापर बियाणे खरेदी, नांगरणी तसेच इतर शेतीसंबंधी खर्चासाठी करण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांचे जीवन सोपे होईल आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था देखील बळकट होईल.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 1 डिसेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लहान आणि सीमांत शेतकऱ्याला 6000 रुपये दिले जातात. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. सध्या योजनेचे 18 हप्ते दिले गेले आहेत आणि आगामी 19 वा हप्ता 2025 च्या फेब्रुवारी महिन्यात दिला जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी 90 टक्के  अनुदानावर अर्ज प्रक्रिया सुरू, शेतकऱ्यांनो जाणून घ्या कसा करावा अर्ज?

जळगावात धावत्या ट्रेनमध्ये ठिणग्या? पाहताचं प्रवाशांनी धडाधड मारल्या उड्या; ११ जणांचा जागीच चिरडून मृत्यू 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button