ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Online nominee registration | घरबसल्या करा शेतजमिनीची वारस नोंद ; अठराव्या दिवशी सातबाऱ्यावर येते नाव !

घरातील शेतजमीन ज्याच्या नावावर आहे, त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क मिळतात. मात्र त्यासाठी शेतजमिनीवर वारस नोंद करावी लागते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यापुढील तीन महिन्यांत वारस नोंदीसाठी अर्ज ( Application) करावा लागतो. यासाठी तलाठी कार्यालयात जावे लागते. त्यावेळी वारस नोंद होते.

ऑनलाइन वारस नोंदणी

मात्र काळ बदलला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानात झालेल्या शासकीय कामाच्या पद्धती देखील बदलल्या आहेत. आजकाल बरीच कामे ऑनलाइन पद्धतीने घरच्या घरी होतात. महाराष्ट्र सरकारच्या ‘ई-हक्क’ प्रणालीद्वारे ( E-Rights system) घरबसल्या तुम्हाला वारस नोंदीसाठी अर्ज करता येतो. ऑनलाइन वारस नोंदीसाठी अर्ज केल्याच्या १८ व्या दिवशी संबंधित व्यक्तीचा अर्ज व कागदपत्रे ( Application & Documents )अचूक असल्यास त्यांची सातबारावर नोंद होते.

महसूल विभागाची ई-हक्क प्रणाली

महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने खास शेतकऱ्यांसाठी ही ‘ई-हक्क’ प्रणाली विकसित केली आहे. या ई-हक्क प्रणालीद्वारे राज्यातील सर्व शेतकरी घरबसल्या सात ते आठ प्रकारचे फेरफार मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज (Online Application) करू शकतात.

यामध्ये खालील कामांचा समावेश आहे.

१) सातबारा उताऱ्यावर बोजा चढविणे
२) सातबारा उताऱ्यावरील बोजा कमी करणे
३) नावाची दुरुस्ती करणे
४) वारस नोंदी करणे
५) ई-करार करणे

अशा महत्त्वाच्या सेवांसाठी ई हक्क प्रणालीद्वारे ऑनलाइन अर्ज करता येतो. दरम्यान अर्जावरील कार्यवाही कुठपर्यंत आली, हे सुद्धा तपासता येते. महत्त्वाची बाब म्हणजे तलाठ्याकडील अर्जावर कार्यवाही झाल्यानंतर तो अर्ज १७ व्या दिवशी मंडलाधिकारी यांच्याकडे जातो आणि १८ व्या दिवशी नोंद करणे किंवा रद्द होतो. यासंबंधीचे सर्व अधिकार मंडलाधिकाऱ्यांना आहेत.

वारस नोंदीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत

१) bhulekh.mahabhumi.gov.in यावर सर्च करून ‘७/१२ दुरुस्तीसाठी ई- हक्क प्रणाली’ सुचनेखालील https://pdeigr.maharashtra.gov.in या लिंकवर क्लिक करावे.

२) याठिकाणी ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ हे पेज उघडल्यावर ‘Proceed to login’ वर क्लिक करून सर्वप्रथम स्वत:चे ऑनलाइन खाते उघडा. त्यासाठी ‘Create new user’ वर क्लिक करून ‘New User Sign Up’ वर स्वत:ची माहिती भरावी. याठिकाणी काही लॉगिन डिटेल्स तुम्हाला भराव्या लागतील.

३)यानंतर तुमचा मोबाईल, पॅनकार्ड नंबर, ई-मेल, पिन कोड टाका. तसेच देश, राज्य, जिल्हा टाकल्यावर ‘Select City’ मध्ये गाव निवडा. येथे address डिटेल्समध्ये घराची माहिती टाकावी लागेल. सर्वात शेवटी कॅप्चा टाका आणि save करा.

४) यानंतर नोंदणी करताना टाकलेले यूझरनेम व पासवर्ड टाकून पुन्हा एकदा लॉगिन करा. याठिकाणी ‘Details’ चे पेज उघडेल. तेथे ‘७/१२ mutations’वर जा.

५) येथे तुम्हाला ‘User is Citizen’ आणि ‘User is Bank’ यातील एक पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर प्रोसेस वर क्लिक केले की, ‘फेरफार अर्ज प्रणाली ई-हक्क’ चे पेज उघडेल. याठिकाणी माहिती भरल्यावर वारस नोंद पर्याय उघडा.

वाचाशिंदे फडणवीस सरकारचा धडाकेबाज निर्णय, ‘हे’ साखर कारखाने ठरणार कर्जासाठी अपात्र

६) याठिकाणी सुरवातीलाक अर्जदाराची माहिती भरा आणि ‘पुढे जा’. त्यानंतर स्क्रीनवर अर्ज मसुदा जतन केल्याचा मेसेज येईल. याठिकाणी अर्ज क्रमांक असेल. दरम्यान मेसेजखालील ‘ok’ वर क्लिक केल्यानंतर मृताचे नाव किंवा खाते क्रमांक टाका, सातबारावरील खाते क्रमांक टाका. पुढे ‘खातेदार शोधा’ वर क्लिक करून मृताचे नाव निवडून घ्या.

७) येथे संबंधित खातेदाराचा गट क्रमांक निवडून मृत्यू दिनांक टाका. यावेळी समाविष्ट करा असे दिसेल त्यावर क्लिक करा. त्याठिकाणी जमीन खातेधारकाच्या जमिनीची माहिती दिसेल. त्यांनंतर अर्जदार वारसांपैकी एक आहे का ? असे विचारले जाईल.

वाचाआता शेतीला मिळणार दिवसा वीज, राज्य मंत्रीमंडळाचा ‘हा’ मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर

८) नंतर वारस म्हणून ज्यांची नावे लावायची आहेत, त्या लोकांची माहिती भरा. इंग्रजीत नावे लिहून जन्मतारीख टाका. तसेच वय टाकल्यानंतर पुढे मोबाईल नंबर आणि पिनकोड टाका. पुढील माहिती भरून पोस्ट ऑफिस निवडा.

९) पुढे मृतासोबतचे नाते निवडा व शेवटी ‘save’ करा. त्यानंतर दुसऱ्या वारसाचे नाव नोंदवायचे असल्यास तेथील ‘पुढील वारस’ वर जा आणि पूर्वीप्रमाणेच माहिती भरा Save करा .

१०) वारसांची नावे भरल्यावर ‘पुढे जा’वर आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. मृत्यू दाखल्याची सत्यप्रत अपलोड करा. तसेच इतर कागदपत्रांमध्ये रेशनकार्ड जोडू शकता. मृत व्यक्तीच्या जमिनीचे ‘८-अ’चे उतारेही लागतील.

ईकेवायसीत घट होण्यात वाढ

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

One Comment

  1. PM kisan saman nidhi yojana me hamne registration kiya 18/10/2021 me lekin abhi tak uska kuch registration hua mahi hai ye kab tak hojayenga PM ji. Aiasa kya problem jo dedh sal hone ko hai kelin registration hua nahi. Aiasa mai 1 kisan nahi hu baki kai sare kisan hai jinone registration kiya aur abtak kuch hua nahi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button