ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

MAPS | ‘मॅप्स’ कडून विद्यार्थ्यांना मिळणार मासिक पाच हजार रुपये; राज्यातील एक लाखांपेक्षा जास्त मुलांना होणार फायदा

MAPS | राज्यातील युवकांसाठी (Youth) सरकार सतत काही न काही योजना राबवित असते. यामध्ये शिक्षण, उद्योजकता विकास, आरोग्य या बाबींचा समावेश असतो. दरम्यान राज्यातील बेरोजगार (Unemployment) तरुणांची संख्या कमी व्हावी यासाठी सरकारने नवीन योजना आखली आहे. शिकाऊ उमेदवारांची व्याप्ती वाढविणे व त्यातून युवकांना जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणे या योजनेमागील उद्देश आहे.

शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना

औद्योगिक अस्थापनांमध्ये (Industrial institutes) उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांचा वापर करून कुशल कारागिरास आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने याआधीच पुढाकार घेतलेला आहे. यासाठी शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना (अप्रेंटीसशीप) राबविली जाते. ही योजना केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली संपूर्ण राज्यात राबविली जाते.

वाचा: नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘या’ अटी त्वरित पूर्ण करा ; अन्यथा होऊ शकते नुकसान !

पाच हजार रुपयांचा मासिक भत्ता

दरम्यान शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेतील सहभागी उमेदवारांना मॅप्स अंतर्गत एक ठराविक भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या अंतर्गत उमेदवारांना राज्य सरकारकडून दर महिन्याला पाच हजार रुपये मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्य शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना (मॅप्स) असे नाव या योजनेला देण्यात आले आहे.

७५ कोटींपेक्षा जास्त रक्कम वितरित

या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शिकाऊ उमेदवारांना देय विद्यावेतनाच्या ७५ टक्के किंवा जास्तीतजास्त ५ हजार रुपये यापैकी कमी असेल ते विद्यावेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फायदा राज्यातील जवळपास एक लाखांपेक्षा जास्त शिकाऊ उमेदवारांना झाला आहे. तसेच त्यासाठी राज्य शासनाकडून ७५ कोटींपेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यात आली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: More than one lakh students form industrial institutes of maharshtra get monthly five thousand stipend

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button