ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Yojana | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! नवीन विहीर खोदण्यासाठी मिळणार 4 लाखांचं अनुदान, ‘असा’ घ्या लाभ

Yojana | आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. परंतु कृषीप्रधान असलेल्या या देशात शेती करणं तितकं सोपं राहिले का? आज शेतकऱ्यांच्या शेतमालाला (Agriculture) कवडीचा कवडीचा भाव मिळत आहे. अनेकदा शेतमालाची होणारी ही नासधूस पाहता सरकार शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊ पाहत आहे. शेतकऱ्यांना (Agricultural Information) मदत व्हावी यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. शेतीला (Farming) सर्वात मोठी गरज असते ती पाण्याची. याच पाण्यासाठी शेतकऱ्यांना मनरेगा योजनेंतर्गत अनुदान (Subsidy) दिले जाते.

वाचा: नोटांवर शाईने खरडल्यास ठरणार अवैध? आरबीआयच्या नव्या गाईडलाईन्स जारी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नवीन विहिरीसाठी मिळणार 4 लाख
शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी खूप पैसा लागतो. पैशांअभावी हे काम रखडलं जात, आता विहिरच नाही म्हणल्यावर शेती (Department of Agriculture) पिकाला पाणी कोठून जाणार? असा प्रश्न उपस्थित होतो. म्हणूनच आता महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना (Agricultural Information) नवीन विहीरीसाठी अनुदान दिले जात आहे. आता या अनुदान वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना नवीन विहिरसाठी तब्बल 4 लाखांच अनुदान या योजनेंतर्गत मिळणार आहे. या संदर्भात 4 नोव्हेंबर 2022 रोजी शासन निर्णय घेण्यात आला होता.

कापूस उत्पादकांची चांदी! कापसाच्या दरात वाढ होण्याचे संकेत; जाणून घ्या किती मिळतोय भाव?

कशी होईल निवड?
• अनुसूचित जाती
• अनुसूचित जमाती
• भटक्या जमाती
• विमुक्त जाती
• दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
• स्त्री-कर्ता असलेली कुटुंब
• विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे
• जमीन सुधारणांचे लाभार्थी
• इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
• सिमांत शेतकरी (2.5 एकर पर्यंत शेतजमीन)
• अल्प भूधारक शेतकरी (5 एकरपर्यंत शेतजमीन)

वाचा: महावितरणाचा सामान्यांसह शेतकऱ्यांना झटका! राज्यात प्रति युनिट ‘इतक्या’ रुपयांनी महागणार वीज

काय आहे लाभधारकाची पात्रता?
• अर्जदाराकडे 1 एकर शेतजमीन सलग असावी.
• पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून 500 मीटरपेक्षा जास्त अंतरावर सिंचन विहीर खोदता येईल.
• दोन विहिरींमध्ये 150 मीटर अंतराची अट अनुसूचित जाती-जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी लागू नाही आणि खासगी विहिरीपासून 150 मीटर अंतराची अट लागू राहणार नाही.
• लाभधारकाच्या सातबाऱ्यावर याआधीच विहिरीची नोंद असू नये.
• एकूण क्षेत्राचा दाखला म्हणजे 8-अ उतारा असावा.
• एकापेक्षा जास्त शेतकरी विहीर घेऊ शकतील, एकूण जमिनीचं सलग क्षेत्र 1 एकरपेक्षा जास्त असावे.
• अर्जदार हा जॉब कार्डधारक असला पाहिजे.

वाचा: ठरलं तर! ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2 हजार, त्वरित तपासा तुम्हाला मिळणार का?

आवश्यक कागदपत्रे
• सातबाराचा ऑनलाईन उतारा
• 8-अ चा ऑनलाईन उतारा
• मनरेगा जॉब कार्डची प्रत
• सामुदायिक विहीर घ्यायची असल्यास सर्व जण मिळून 40 गुंठे जमीन सलग असल्याचा पंचनामा व समोपचारानं पाणी वापराबाबतचे करारपत्र.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Important news for farmers! 4 lakhs subsidy will be available for digging a new well

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button