ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

NABARD | दुग्धव्यवसाय करणे झाले सोप्पे: नाबार्ड चा विशेष शेतकरी साठी पुढाकार; जाणून घ्या पात्रता व प्रकिया…

NABARD | मागील काही वर्षात शेतकरी सतत शेती व्यवसायामुळे तोट्यात जात आहेत. आधीच नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीचे होणारे नुकसान व नंतर पीक येऊनही शेतीमालाला न मिळणारा भाव यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसत आहे. म्हणून बहुतेक शेतकरी शेतीपूरक व्यवसायांकडे वळले आहेत.

व्यवसायासाठी दिले जाते अनुदान

यामध्ये प्रामुख्याने कुक्कुटपालन, पशुपालन, मत्स्यव्यवसाय व दुग्धव्यवसाय यांचा समावेश होतो. या व्यवसायांसाठी सरकार देखील विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करत आहे. तसेच शेतकऱ्यांना व्यवसाय उभारण्यासाठी अनुदान देखील दिले जात आहे.

डेअरी व्यवसायासाठी नाबार्ड देते कर्ज

सध्याच्या काळात दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा चांगला पर्याय बनला आहे. शेतकरी स्वतःचा डेअरी व्यवसाय सुरू करून चांगले उत्पन्न काढत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे डेअरी (Dairy) व्यवसायासाठी नाबार्ड शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देत आहे. (Dairy Loan) यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा कल या व्यवसायाकडे वाढत आहे.

डेअरी उद्योजकता विकास योजना

डेअरी (dairy) उद्योजकता विकास या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नाबार्ड तर्फे दुग्धव्यवसायासाठी मदत केली जात आहे. पशुपालनाद्वारे दुग्धउत्पादन वाढावे व शेतकऱ्यांना फायदा व्हावा या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. बहुतेक शेतकरी या योजनेचा फायदा त्यांच्या व्यवसायासाठी करून घेत आहेत. या योजने अंतर्गत जनावरांच्या चारा खरेदीसाठी व जनावरे खरेदीसाठी आर्थिक व्यवस्था केली जाते.

या योजने अंतर्गत खालील गोष्टींसाठी कर्ज दिले जाते.

1) पशुधन खेरदी
2) मिल्किंग मशिन
3) डेअरी प्रोसेसिंग युनिट
4) वाहतूक
5) शीतगृह
6) डेअरी मार्केटींग आऊटलेट

डेअरी उद्योजकता विकास योजनेची वैशिष्ट्ये

डेअरी उद्योजकता विकास योजने अंतर्गत सहकारी, प्रादेशिक, व्यावसायिक, ग्रामीण किंवा नाबार्ड बँकांकडून डेअरी व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. (Dairy Enterprenurship Development Scheme) यामध्ये 7 लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. तसेच घेतलेल्या कर्जावर सरकारकडून 33.33 टक्के अनुदान मिळते. या योजनेतून तुम्ही कमीत कमी दोन ते जास्तीत जास्त दहा जनावरे खरेदी करू शकता. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाकडून हा निधी दिला जातो.

आवश्यक पात्रता व प्रक्रिया

डेअरी उद्योजकता विकास योजनेअंतर्गत जनावरांच्या चाऱ्याची तरतूद करण्यासाठी अर्जदाराकडे पूरेशी जमीन असणे आवश्यक आहे. तसेच फक्त 18 ते 65 वर्ष वयोगटातील अर्जदार या योजनेचा लाभ घेवू शकतात. कर्ज (loan) घेण्यासाठी अर्जदाराला आपल्या जवळील प्रादेशिक, व्यावसायिक, ग्रामीण किंवा नाबार्ड बँकेत जावे लागेल. तसेच चौकशी करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Nabard Dairy loan scheme for farmers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button