ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान

Fall Army Worm | अमेरिकन लष्करी अळीची चिंताच मिटली? जाणून घ्या काय आहे नवीन ‘जीएम’ तंत्रज्ञान

कमी काळात हाताशी येणारे पीक म्हटलं की समोर पहिल्यांदा मका पीक उभे राहते. मका हे पीक जलद रित्या वाढते. त्याचबरोबर मक्याचा (Maize crop) प्रचंड फायदा शेतकर्‍यांना होतो.

Fall Army Worm | या पिकातून भरघोस उत्पन्न मिळते. बाजारात देखील त्याला मोठ्या प्रमाणात भाव मिळतो. मात्र, या पिकाची शेतकऱ्यांना चांगलीच बारकाईने काळजी घ्यावी लागते. मकेवर विविध प्रकारच्या अळीचा रोग पडत असतो. या अळीमुळे शेतकऱ्याचे (AGRICULTURE) टेन्शन वाढू शकते. याच आळ्यांपैकी मकेवर हल्ला करणारी अमेरिकन लष्कर अळी (fall Army Worm) आहे. ही अळी अतिशय विध्वंसक आहे. जगभरातील मका उत्पादकांना पुढे संकट बनून राहिलेल्या या अळीच्या दृष्टीने नव्या तंत्रज्ञानाचा दृष्टिकोन घेऊन ‘ऑक्सिटेक’ या आंतरराष्ट्रीय संशोधन समूहाने अळीचे जीएम नर पतंग विकसित केले आहेत. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या नव्या तंत्रज्ञानामुळे काय होईल फायदा?
खर तर, ही अळी मकेवर हल्ला करून पिकाचा नायनाट करते. मात्र, या नवीन तंत्रज्ञानाच्या कार्यपद्धतीचा नवीन मादी जन्माला येणाऱ्या पिलांना प्रौढावस्थेत प्रवेश करण्यापासून रोखते. ज्यामुळे ही प्रजात पुढे जन्माला येत नाही अशा प्रकारे या अळीचे नियंत्रण करता येऊ शकते.

वाचा: AGNIASTRA : A BOON | कीटकांमुळे त्रस्त आहात? तर वापरा अग्निअस्त्र, जाणून घ्या अग्निअस्त्त्राविषयी संपूर्ण माहिती

‘या’ देशाने दिली तंत्रज्ञानाला प्रथम परवानगी
या अळीचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्वप्रथम या तंत्रज्ञानाला ब्राझील या देशाने परवानगी दिली. ब्राझील हा सर्वात मोठा मका उत्पादक देश आहे. ब्राझील देशामध्ये या तंत्रज्ञानाच्या विविध चाचण्या करण्यात आल्या आहेत. जेथे देशातील हजारो एकर बीटी मका शेतांमध्ये २०२१-२२ च्या हंगामात पथदर्शी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

वाचा: Weed Control | एकात्मिक तण नियंत्रण करा आणि उत्पादन वाढवा! जाणून घ्या सविस्तर माहिती…

काय आहे हे तंत्रज्ञान ?
मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा उपयोग करून देखील ही लष्करी आळी नियंत्रणात येत नाही. त्याचमुळे इंग्लंडमधील ‘ऑक्सिटेक’ या आंतरराष्ट्रीय संशोधन समूहाने नवा दृष्टिकोन तंत्रज्ञानाद्वारे ही अळी नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यात ‘सेल्फ लिमिटिंग जीन’चा समावेश केलेले अमेरिकन लष्करी अळीचे जनुकीय सुधारित नर पतंग विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे अळी नियंत्रणात येऊ शकते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button