ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Lok Sabha Elections | लोकसभा निवडणुकांची रणधुरी! आचारसंहिता लागू अन् ७ टप्प्यात होणार मतदान, जाणून घ्या निकाल कधी?

Lok Sabha Elections | Battle for Lok Sabha elections! Code of conduct will be implemented and voting will be held in 7 phases, when will you know the results?

Lok Sabha Elections | देशात लोकसभा निवडणुकांची रणधुरी आता सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची (Lok Sabha Elections) घोषणा केली. १६ जून २०२४ रोजी लोकसभेचा कार्यकाळ संपत आहे. त्याचबरोबर देशातील काही राज्यांमध्ये विधानसभेचा कार्यकाळही संपत आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यात येणार आहेत.

१०.५ लाख पोलिंग बूथ आणि ९७ कोटींपेक्षा जास्त मतदार असलेली ही निवडणूक ७ टप्प्यात पार पाडण्यात येणार आहे. ५४ लाखांपेक्षा जास्त ईव्हीएम मशिन्स आणि दीड कोटी निवडणूक अधिकारी या निवडणुकीसाठी कार्यरत असतील.

नवीन मतदार:
यावेळी १.८२ कोटी नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात ४८ हजार तृतीयपंथी मतदार आणि २ लाख १०० वर्षांवरील मतदार आहेत. ४९.७ कोटी पुरुष आणि ४७.१ कोटी महिला मतदार या निवडणुकीत सहभागी होणार आहेत. १८ ते २१ वयोगटातील २१.५० कोटी मतदार ही तरुण पिढी निवडणुकीवर परिणाम करणार आहे. महिला मतदारांची संख्या १२ राज्यात पुरुषांपेक्षा जास्त आहे.

आयोगाची कठोर पावलं:
निवडणूक आयोगाने मसल आणि मनी पॉवर रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. मागील विधानसभा निवडणुकांमध्ये पैसा आणि बळाचा वापर झाल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे यावेळी अशा घटना घडू देणार नाही, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.

वाचा | Crop loan | ‘या’ जिल्हा बँकेचा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! 31 मार्चपर्यंत कर्ज भरा आणि मिळवा व्याज माफी!

अफवांवर लगाम:
निवडणुकीच्या काळात अफवा पसरवण्यावर आळा घालण्यासाठी आयोगाने ‘मिथ वर्सेस रियालिटी’ नावाची वेबसाईट लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेबसाईटवर अफवा आणि त्यांची वस्तुस्थिती दर्शवण्यात येणार आहे.

  • मतदान कार्यक्रम:
  • ५४३ लोकसभा मतदारसंघ
  • ७ टप्प्यात निवडणुका
  • पहिला टप्पा: १९ एप्रिल – मतदान
  • दुसरा टप्पा: ४ एप्रिल – अर्ज स्वीकारणे, २६ एप्रिल – मतदान
  • तिसरा टप्पा: १९ एप्रिल – अर्ज स्वीकारणे
  • चौथा टप्पा: १३ मे – मतदान
  • पाचवा टप्पा: २० मे – मतदान
  • सहावा टप्पा: २५ मे – मतदान
  • सातवा टप्पा: १ जून – मतदान
  • महाराष्ट्र: ५ टप्प्यात मतदान, 4 जून – मतमोजणी
  • आता निवडणुकीच्या रणगाड्या रस्त्यावर उतरतील आणि राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करतील.

Web Title | Lok Sabha Elections | Battle for Lok Sabha elections! Code of conduct will be implemented and voting will be held in 7 phases, when will you know the results?

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button