योजना

Free Ration Scheme | आनंदाची बातमी ! मोदी सरकारची मोठी भेट; आणखी 5 वर्षांसाठी मिळनार मोफत रेशन?

Free Ration Scheme | Good news! Modi government's big gift; Free ration for another 5 years?

Free Ration Scheme | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी जाहीर केले की, देशातील 80 कोटी गरीब लोकांना (Free Ration Scheme) मोफत रेशन देण्याची योजना आणखी 5 वर्षांपर्यंत वाढवली जाईल.

मोदींनी ट्विट करून ही घोषणा केली. त्यांनी म्हटले की, “मी ठरवलं आहे की भाजपा सरकार आता देशातील 80 कोटी गरीब लोकांना मोफत रेशन देण्याची योजना पुढील 5 वर्षांपर्यंत वाढवणार आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद मला नेहमी पवित्र निर्णय घेण्याचं बळ देतं.”

मोदींनी या घोषणेत काँग्रेसवरही निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, काँग्रेसने गरिबांना फसवणुकीशिवाय काहीही दिलं नाही. “काँग्रेस गरिबांची कधीच कदर करत नाही. गोरगरिबांचे दु:ख त्यांना कधीच कळत नाही. त्यामुळे जोपर्यंत काँग्रेस केंद्र सरकारमध्ये राहिली तोपर्यंत गरिबांचे हक्काचे पैसे लुटून खात राहिली आणि आपल्या नेत्यांच्या तिजोरीत भरत राहिली. 2014 मध्ये सरकार आल्यानंतर तुमच्या या मुलाने गरीब कल्याणाला सर्वात जास्त प्राधान्य दिलं. आम्ही आमच्या गरीब बंधू-भगिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण केला की त्यांची गरिबी दूर केली जाऊ शकते.”

वाचा : Crop Insurance | १ रुपयात विमा; शेतकऱ्यांनो, आता रब्बी हंगामासाठी विमा घेऊनच बघा ! जाणून घ्या त्वरित …

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत केंद्र सरकार देशातील 80 कोटी लोकांना मोफत रेशन पुरवते. डिसेंबर 2022 मध्ये ही योजना एका वर्षासाठी वाढवण्यात आली होती. या योजनेमुळे केंद्र सरकारवर वार्षिक 2 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडतो. गरिबांना रेशनसाठी एक रुपयाही द्यावा लागत नाही.

मोदींनी आजच्या घोषणेमुळे निवडणुकीच्या आधी सरकारला मोठा राजकीय फायदा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

Web Title : Free Ration Scheme | Good news! Modi government’s big gift; Free ration for another 5 years?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button