Lok Sabha Intrusion | लोकसभेत घुसखोरीचा थरार, दोन अज्ञातांनी घातला गोंधळ; “तानाशाही नही चलेगी” अशा घोषणा देत धावले खासदारांच्या दिशेने!
Lok Sabha Intrusion | Thrill of intrusion into Lok Sabha, two unknowns created chaos; "Dictatorship will not run" ran towards MPs!
Lok Sabha Intrusion | देशाच्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज एक धक्कादायक घटना घडली. लोकसभेत दोन अज्ञात व्यक्तींनी घुसखोरी करत प्रेक्षक दीर्घिकेतून सभागृहात (Lok Sabha Intrusion) धाव घेतली. त्यांनी खासदारांच्या आसनावरून उड्या मारत थेट सभापतींच्या जागेकडे जाण्याचा प्रयत्न केला.
या घटनेमुळे संसदेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सभापतींनी सुरक्षा दलाला या दोघांना ताब्यात घेण्याचे निर्देश दिले. काही खासदारांनीही त्यांना अडविण्यासाठी धाव घेतली. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आले.
पहा व्हिडिओ…
https://youtu.be/ru5xzBc7T5U?si=RlMb7MnNzFYK0jLy
घटनेनंतर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “लोकसभेचे कामकाज सुरू असताना अचानक दोघे व्यक्ती प्रेक्षक दीर्घिकेतून सभागृहात उतरून आले. त्यांनी जोरजोरात “तानाशाही नही चलेगी” अशा घोषणा देत खासदारांच्या आसनावरून उड्या मारत सभापतींच्या दिशेने धाव घेतली. एकाने बूटमधून काहीतरी घेऊन धूर पसरवण्याचा प्रयत्न केला. पण खासदारांनी वेळीच त्याला पकडून धरले.”
वाचा : Cabinet Decision | शेतकऱ्यांना दिलासा; पेंड बंद, पामतेलाला घाम, कापूसाला झळक; पण निर्णय काय, आणि कधी?
सावंत यांनी पुढे सांगितले, “या गोंधळादरम्यान सभागृहात काही क्षणांसाठी पिवळ्या रंगाचा गॅस पसरला. यामुळे अनेकांना नाक व डोळयांना त्रास झाला. अद्याप या गॅस कुठून आला याचा तपास सुरू आहे.”
या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. तसेच या दोघांच्या उद्देशाबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. सुरक्षा दल या घटनेचा तपास करत असून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
Web Title : Lok Sabha Intrusion | Thrill of intrusion into Lok Sabha, two unknowns created chaos; “Dictatorship will not run” ran towards MPs!
हेही वाचा :