ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्यायोजना

LIC New Jeevan Shanti Yojana | एलआयसीच्या ‘नवीन जीवन शांती योजने’त फक्त एकदा जमा करा ‘इतकी’ रक्कम अन् आयुष्यभर मिळवा 50 हजार पेन्शन

LIC New Jeevan Shanti Yojana | एलआयसीच्या ‘नवीन जीवन शांती योजने’त फक्त एकदा जमा करा ‘इतकी’ रक्कम अन् आयुष्यभर मिळवा 50 हजार पेन्शन

LIC New Jeevan Shanti Yojana | LIC ने अशी एक योजना आणली आहे, ज्यामुळे तुम्ही पैसे जमा केल्यावर तुम्हाला मनःशांती मिळेल. यामध्ये एकरकमी पैसे गुंतवून तुम्ही वृद्धापकाळाच्या चिंतेपासून मुक्त होऊ शकता. कंपनीने या पॉलिसीला जीवन शांती असे नाव दिले आहे. त्याचा उद्देश हा आहे की एकदा पैसे गुंतवून तुम्ही आयुष्यभर शांततेने जगू शकता. पॉलिसीनुसार, 5.50 लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांना दरवर्षी 50,000 रुपये पेन्शन मिळेल. पेन्शनसाठी खास तयार केलेल्या एलआयसीच्या या योजनेचे (LIC New Jeevan Shanti Yojana) सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते एकदाच जमा करावे लागेल. तसेच निवृत्तीनंतर आयुष्यभर तुम्हाला पेन्शन मिळेल. एलआयसीच्या नवीन जीवन शांती योजनेचा प्लॅन हा क्रमांक 858 आहे. या योजनेची वैशिष्ट्ये आणि अटी आणि शर्ती जाणून घेऊयात.

वाचा : Bal Jeevan Bima Yojna| आपल्या मुलांचं भविष्य करा सुरक्षित, पोस्टाची जबरदस्त स्कीम; सहा रुपयात मिळवा एक लाख रुपये

Buy LIC New Jeevan Shanti Insurance Plan | एलआयसी नवीन जीवन शांती विमा प्लॅन खरेदी
काही कारणास्तव नोकरीत मुदतपूर्व निवृत्ती घ्यावी लागते, अशा परिस्थितीत उत्पन्नाचा स्रोत संपतो. हा प्रकार लक्षात घेऊन एलआयसीची ‘नवीन जीवन शांती योजना’ तयार करण्यात आली आहे. ही एक स्थगित अॅन्युइटी योजना आहे, जी तुम्ही घेताना पेन्शनची रक्कम निश्चित करू शकता. किमान एक वर्षाच्या नियमित अंतरानंतर, तुम्हाला दरमहा पेन्शन मिळू लागते.

Key Features of LIC New Jeevan Shanti Yojana | LIC नवीन जीवन शांती योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

  • ही एक सिंगल प्रीमियम योजना आहे, याचा अर्थ तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागेल.
  • स्थगित वार्षिकी योजना (गुंतवणूक केल्यानंतर 1 ते 12 वर्षांच्या कालावधीनंतर पेन्शन मिळण्याचा पर्याय)
  • वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि मासिक पेन्शन रक्कम प्राप्त करण्याचा पर्याय
  • 10 लाखांच्या गुंतवणुकीवर 11000 रुपयांपेक्षा जास्त मासिक पेन्शन उपलब्ध आहे
  • या योजनेत 6.81 ते 14.62% व्याज
  • एकल जीवन आणि संयुक्त जीवन दोन्हीमध्ये पेन्शन मिळण्याची सुविधा

प्रवेशाचे किमान आणि कमाल वय
30 ते 79 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. विशेष बाब म्हणजे ही योजना तुम्ही कधीही सरेंडर करू शकता. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. या कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या खात्यात जमा केलेली रक्कम आणि काही अतिरिक्त रक्कम नॉमिनीला दिली जाईल. या प्लॅनमध्ये कोणतेही रिस्क कव्हर नाही.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा :

Web Title: LIC’s ‘Naveen Jeevan Shanti Yojana’ just deposit ‘so much’ amount once and get lifetime pension of 50 thousand

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button