ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

LIC | ‘या’ एलआयसी स्कीमद्वारे लाभधारकांना मिळणार मासिक ११ हजार रुपये; पहा सविस्तर…

New Jeevan Shanti Scheme : एलआयसीबद्दल (LIC Policy) आपण कधीना कधी ऐकलं असेल. काही वेळा काही एलआयसी योजनांद्वारे लमसम महिन्याला पैसे भरावे लागत असून काही वर्षांनंतर त्याची रक्कम मिळते. मात्र आता एलआयसीची एक नवीन योजना आली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभधारकाला महिन्याला पैसे भरण्याची गरज नाही. तर आता महिन्याला खात्यात पैसे जमा होणार आहे.

महिन्याला आता या योजनेद्वारे ११ हजार रुपये कोणतेही कष्ट न करता खात्यात जमा होणार आहे. न्यू जीवन शांती पॉलिसी ( New Jeevan Shanti Policy) असे या योजनेचे नाव आहे. याद्वारे कमी इनवेस्टमेंटमध्ये अधिक पैसे मिळवू शकता. ही एलआयसी स्कीम एक एन्युटी प्लॅन आहे. यामध्ये तुम्ही जेवढी एकहाती रक्कम भराल तेवढी रक्कम पेंशनमध्ये फिक्स होणार आहे. या एन्युटी प्लॅनमध्ये दोन प्रकार आहेत.

एन्युटी प्लॅनचे दोन प्रकार :

एन्युटी प्लॅनमध्ये दोन प्रकार मोडतात. त्यातील पहिला प्रकार हा डेफर्ड एन्युटी फॉर सिंगल लाईफ आणि डेफर्ड एन्युटी फॉर जॉईंट लाईफ. यामध्ये डेफर्ड एन्युटी फॉर सिंगल लाईफमध्ये एका व्यक्तीचा समावेश असतो. तसेच डेफर्ड एन्युटी फॉर जॉईंट लाईफ या प्रकारात दोन व्यक्तींचा समावेश होतो. या योजनेत ३० ते ७९ वयोगटापर्यंत व्यक्ती भाग घेऊ शकतात. यामध्ये १.५ लाखांपासून इनवेस्ट करावे लागणार असूनअशावेळी महिन्याला १००० रुपये पेन्शनचा लाभ मिळू शकतो.

तसेच १० लाख रुपये इनवेस्ट करून सिंगल लाईफसाठी पॉलिसी खरेदी केल्यानंतर महिन्याला ११ हजार एकशे ९२ रुपये दर महिन्याला पेन्शन मिळू शकते. डेफर्ड एन्युटी सिंगल लाईफसाठी कुणी घेतली असेल तर त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पैसे पैसे नोमिनीला मिळतात. तसेच जॉईन लाईफबाबत सांगायचं झालं तर एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यास दुसऱ्याला पेन्शनची सुविधा मिळणार पण दोन्ही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तो पैसा नोमिनिला मिळतो.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Web Title: LIC jeevansathi scheme best for peoples

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button