स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजनामुळे मिळणार तहानलेल्या गावांना पाणी…
Late. Meenatai Thackeray Rural water storage scheme will provide water to thirsty villages ...
उन्हाळा जवळ येताच पाण्याची टंचाई काही भागांमध्ये तीव्रतेने जाणवू लागते हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागते ग्रामीण भागामध्ये पाणीटंचाईचे प्रश्न वर्षानुवर्ष तसेच राहिले आहेत, या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी गाव- वाड्या-वस्त्यामधील जनतेला पाणीसाठा उपलब्ध करून देण्यासाठी ‘स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना‘ राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Government) घेतला आहे.
महाराष्ट्र राज्यात (In the state of Maharashtra) सुमारे ४२.५ टक्के क्षेत्र १७३ तालुके हे टंचाईग्रस्त क्षेत्र आहे. भौगोलिक स्थितीचा आढावा घेतल्यास मोठा जलसाठा असून देखील, गावोगावी तसेच वाडी वस्तीवर शुद्ध पाणी पिण्यासाठी देखील उपलब्ध नाही. ही टंचाई दूर करण्यासाठी कॅच द रेन’ (Catch the Rain) या तत्वावर नव्याने योजना आखण्यात आली.
काय आहे स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना? Late. Meenatai Thackeray Rural Water Storage Scheme ही योजना, डोंगराळ भागांमध्ये, अतिदुर्गम भागात ज्या ठिकाणी पाणीटंचाईच्या खूप मोठ्या समस्या आहेत अशा ठिकाणी राबवण्यात येणार आहे, पावसाळ्यातील पाण्याची साठवणूक करून, फेरोसिमेंट अथवा आर. सी. सी. सिमेंटच्या साठवण टाक्या, जलकुंभ, साठवण टाक्या, पावसाचे पाणी किंवा झऱ्याच्या पाण्यावर आधारित साठवण तलाव, छोट्या टाक्या (पागोळी विहीर) किंवा बंद असलेल्या भूमिगत साठवण टाक्या यामध्ये साठवून ठेवले जाईल. उन्हाळ्यामध्ये या पाण्याचा उपयोग केला जाईल.
या योजनेच्या अंमलबजावणी (Implementation) करण्याकरिता चे अधिकार ग्रामपंचायतीला असतील त्याचप्रमाणे 15 लाख रुपये अधिकार ग्रामपंचायतीला असतील व पंधरा लाखापेक्षा अधिक खर्च करण्याचा अधिकार अधिकार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी (Zilla Parishad Chief Executive) अधिकाऱ्याना देण्यात आले आहेत. या समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतील.
हेही वाचा :
1)सरकारकडून या वनस्पतींच्या लागवडीसाठी 75 टक्के अनुदान घोषित… वाचा सविस्तर पणे
2)मी E शेतकरी बोलतोय, “सातबारा चा उतारा कसे नाव पडले ठाऊक आहे का?=