कृषी बातम्या

नगर: कांदा उत्पादक शेतकरी चिंतातूर शेतातील कांद्याचे काय करायचं?

Nagar: Onion growers are worried about what to do with onions in the field.

नगर जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादकांना (Onion growers in Nagar district) मोठ्या संकटांना सामना करावा लागत आहे. एकीकडे वरुणराजाने हजेरी लावली आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद आहेत. शेतकऱ्यांना फार मोठा प्रश्न पडलेला (question for the farmers) आहे की शेतातील कांद्याचे काय करायचं? शेतात पडून असलेला कांदा खराब होण्याच्या मार्गावर आहे. याचाच फायदा घेऊन अनेक व्यापारी बांधावर कांदा घ्यायला येत आहेत. परंतु व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे (Due to the arbitrariness of traders) कांद्याला फार कमी भाव मिळत आहे. त्यामुळे कांद्याला जवळजवळ सहा ते सात रुपये प्रति किलो कमी भाव व्यापारी देत आहेत.

नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यंदा पाण्याची मुबलक उपलब्धता असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केलेली होती. शेतकऱ्यांनी जवळजवळ एक लाख 75 हजार हेक्टर पर्यंत कांदा उत्पादित केलेला होता. रब्बी मध्ये घेतलेला कांदा खरिपाच्या तोंडावर विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये येत असतो.

[metaslider id=4085 cssclass=””]

बाजार समित्यांमध्ये तीन दिवस कांद्याचा लिलाव होत असतो. त्यामुळे ऐन मोसमात बाजार समित्या बंद (Market committees closed) असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे एका आठवड्यात बाजार समित्यांमध्ये जवळजवळ पन्नास कोटीची उलाढाल होत असते. यंदा कांद्याच्या बियाण्यामध्ये (In onion seeds) असलेला दोषामुळे कांदा फार दिवस टिकणार नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कांदा साठवणुकीसाठी योग्य नाहीये.

या करोना च्या काळामध्ये कांदा साठवणूक (Onion storage) करण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार मोठी सोय उपलब्ध नाहीये. मागील पंधरा दिवसात हवामान बदल ( Climate change) आणि अवकाळी पाऊस यांच्या आगमनामुळे शेतकरी चिंतेत आहे. खाजगी व्यापारी शोधून आपला कांदा लवकरात लवकर विक्री व्हावा असे शेतकऱ्यांना आता वाटू लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक फटका बसत आहे. प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर बाजार समिती चालू करावे अशी शेतकऱ्यांकडून आशा व्यक्त होत आहेत.

हे ही वाचा:

1.पुणे जिल्ह्यामध्ये, ‘या’ वेळेत सुरू राहणार कृषी सेवा केंद्र…

2.राज्यामध्ये बियाण्यांचे तत्काळ धोरण आखावे, वाचा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी काय निर्देश दिले आहे कृषी विभागाला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button