ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Land | शेतकऱ्यांनो जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात होतेय फसवणूक, ‘अशी’ घ्या काळजी

मागील काही वर्षापासून जमिनीच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अनेकजण मोठ्या प्रमाणात जमिनीचे भाग करून विक्री (Land for sale) करत आहेत.

Land | अनेकजण गुंतवणूक म्हणून जमिन खरेदी (Land purchase) करत असतात. मात्र, राज्यात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात (Land purchase and sale transaction) अनेकवेळा फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार (Land transaction) करताना नेहमी काळजीपूर्वक सर्व गोष्टींची माहिती घ्यायला हवी, अन्यथा अशा व्यवहारातून तुम्हाला लाखो रुपयांचा गंडा बसू शकतो.

जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार हा दोन गटातील व्यक्तींमध्ये कायदेशीररित्या दस्तऐवज केलेला करार असतो. ज्यामध्ये विक्रेत्याकडे असलेली मालमत्ता ही खरेदी करणाऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केली जाते. याला मालमत्ता खरेदी-विक्री करारही म्हणतात. जमिनीच्या वाढत्या किमतीमुळे प्लॉट बळकावणे, परस्पर जमिनीची विक्री करणे, फ्लॅटवर अनधिकृत ताबा मिळवणे यांसारख्या अनेक घटना वारंवार घडत असतात.

वाचा: Yojana | सधन कुक्कुट विकास योजनेंतर्गत ‘या’ जिल्ह्यासाठी अर्ज सुरू, जाणून घ्या पात्रता व अटी

जमिनीच्या व्यवहारामध्ये कशा प्रकारे होतेय फसवणूक? अन् कशी घ्यावयाची काळजी?

जमिनीच्या कागदपत्रांवर विक्रेत्याची सही
विक्रीसाठीच्या करारावर स्वाक्षरी करणे महत्वाचे आहे. कारण, प्रथम खरेदीदार आणि विक्रेत्याने करार केल्याचा हा कायदेशीर पुरावा आहे. सही केलेल्या या कागदपत्राच्या आधारे पुढे जाऊन वाद झाल्यास हा जमिनीचा सही केलेला कागद महत्वाचा ठरतो.

बोगस कागदपत्रे, व्यक्ती
जमिनीचा खरेदी-विक्री व्यवहार करताना अनेकदा बोगस कागदपत्रे सादर केली जातात. तसेच, खरेदी-विक्री व्यवहार करताना त्या ठिकाणी बोगस व्यक्ती देखील उभा केला जातो. त्यामुळे जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार करताना संबंधित जमिनीच्या कागदपत्राची आणि जमीन विक्रेत्याच्या ओळखपत्राची (आधार कार्ड/पॅन कार्ड) खात्री करावी.

वाचा: Donkey Milk Farm | आयटीची नोकरी सोडून सुरू केला गाढवाच्या दुधाचा व्यवसाय, आता कमावतोय…

एकच जमीन दोन-तीन व्यक्तींना विकणे
जमीन खरेदी केल्यानंतर सुरुवातीला त्याचे खरेदीखत रजिस्टर केले जाते. यानंतर सातबारावर त्याची नोंद होते. मात्र, ह्या सर्व प्रोसेसला तीन महिन्यांचा कालावधी जातो. या कालावधीच्या आगोदरच जमीन मालक पुन्हा एकदा जमिनीची विक्री रजिस्टर खरेदीखत वापरून दुसऱ्या व्यक्तीस करू शकतो. त्यामुळे जमीन खरेदी केल्यानंतर त्वरित कागदपत्रांमध्ये स्वतःची नोंद करून घ्यावी. तसेच, वेळोवेळी जमिनीच्या कागदपत्रांची चाचपडताळणी करावी.

गहाण ठेवलेल्या जमिनीची विक्री
जमीन मालकाने जमिनीवर कोणत्याही प्रकारचे कर्ज कडले असेल किंवा जमीन गहाण ठेवली असेल तर या कर्जाची सातबाऱ्यावर नोंद होण्यापूर्वीच त्या जमिनीची विक्री केली तर ग्राहकाची फसवणूक होते. त्यामुळे जमीन खरेदी करताना नेहमी त्या जमिन मालकाची या गावच्या विश्वासू व्यक्तीकडून माहिती मिळावी. तसेच, बँकेतून जमिनीवर कोणतेही कर्ज काढले आहे का याची खात्री करावी.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button