सध्या स्टीव्हिया शेतीची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. साखरेला दुसरा पर्याय म्हणून स्टीव्हिया शेती (Stevia farming) असल्याचे बोलले जात आहे. या झाडाची पाने 20 ते 30 पटीने साखरे पेक्षा गोड असतात व देश विदेशात डायबिटीस रुग्णांची संख्या अधिक असल्याने या शेतीची मागणी अधिक प्रमाणात केली जात आहे. “स्टीव्हीया शेती” (Stevia farming) ही एक मेडिसिन प्लांट असून ही झाडे ची लागवड करून तुम्ही ही 4 ते 5 पटीने अधिक उत्पन्न घेऊ शकता. चला तर आपण या वनस्पती (Plant) विषयी सविस्तर माहिती पाहूया..
खर्च व उत्पन्न –
1) कमी जागेत ही शेती होते यामध्ये 4 पट उत्पन्न अगदी सहज तुम्ही काढू शकता.
2) साधारण 1 एकर मध्ये 40,000 रोपे लावू शकता.
3) या रोपट्यांचा सर्व खर्च साधारण 1 लाखापर्यंत होतो.
4) तसेच खर्च केल्याप्रमाणे मिळणारे उत्पन्न 4 पट पेक्षा अधिक मिळते.
5) कमी जागेत चांगले उत्पन्न काढू शकता.
6) या झाडाची रोपे बनवून, एक रोपा मागे जवळपास 120 ते 140 रूपये कमावू शकता.
हे ही वाचा– केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता टोमॅटो विक्रीचा प्रश्न मिटला, वाचा काय घेतला निर्णय?
स्टीव्हीया शेतीची ठिकाणे-
भारतात मोठ्या प्रमाणात स्टीव्हीयाची लागवड केली जाते.
बेंगळुरू, पुणे, इंदोर, आणि रायपूर या शहरांमध्येही ही शेती केली जाते. जगात पॅराग्वे, जपान, कोरिया, तैयवान आणि अमेरिका याठिकानीही स्टीव्हीया शेती मोठ्या प्रमाणात करतात.
हे ही वाचा– आता आपणही लवंग लागवड करू शकतो; “या” पद्धती वापरून फुलवा लवंग शेती व मिळवा अधिक उत्पन्न..
स्टीव्हीया वनस्पतींची वैशिष्ट्ये –
- ही वनस्पती अनेक वर्ष टिकते.
- जास्त फांद्यांची असलेली ही वनस्पती आहे.
- या वनस्पतींची पाने आंब्याच्या पाणासारखी असतात.
- ही वनस्पती 60 ते 70 सेमी पर्यंत वाढते.
- विशेष म्हणजे या झाडांची पाने चक्क 20 ते 30 पटीने साखरेपेक्षा गोड असतात.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा: