कृषी सल्ला

Satabara | शेतकऱ्यांनो तुमच्याकडील सातबारा खरा आहे की बोगस? चुटकीसरशी ‘या’ सोप्या पद्धतीने जाणून घ्या सविस्तर

Farmers, is your satbara real or bogus? Know in detail 'this' in a simple way in a pinch

Satabara | जमिनीचा व्यवहार करायचा असेल तर सातबारा उतारा हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. यामध्ये जमिनीची संपूर्ण माहिती असते. मात्र, बनावट सातबारा तयार करून अनेक बेकायदेशीर कामे देखील केली जातात. त्यामुळे सातबारा खरा आहे की खोटा हे तपासणे आवश्यक आहे.

बोगस सातबारा कसा ओळखाल?
तलाठ्याची सही:
सातबारा उताऱ्यावर तलाठ्याची सही असते. त्यामुळे सातबारा उताऱ्यावर तलाठ्याची सही नसेल तर तो सातबारा बोगस असतो. मात्र, आता डिजिटल सातबारा उपलब्ध आहे. या सातबारावर “सातबारा उताऱ्यावरील गाव नमुना सात आणि गाव नमुना 12 डिजिटल स्वाक्षरीत तयार केला असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्काची गरज नाही” असे लिहिलेले असते.

क्यूआर कोड: सातबारा उताऱ्यावर आता क्यूआर कोड देण्यात आला आहे. सातबारा उताऱ्यावर क्यूआर कोड नसेल तर तो सातबारा बोगस असतो. सातबारा उताऱ्याच्या प्रिंटवरती असलेला क्यूआर कोड स्कॅन केल्यास ओरिजनल सातबारा उताऱ्याची माहिती दिसते.

एलजीडी कोड आणि ई महाभूमी प्रकल्पाचा लोगो: सातबारा उताऱ्यावर आता संबंधित गावाचा एक युनिक कोड देखील नमूद केलेला असतो. हा कोड उताऱ्यावर गावाच्या नावासमोर कंसामध्ये असतो. जर तुमच्याकडे आलेल्या सातबारा उताऱ्यावर हा कोड नसेल तर तो उतारा बोगस समजावा. तसेच, सातबारा आणि आठ अ चा उताऱ्यावर वरच्या बाजूला इ महाभुमी प्रकल्प आणि महाराष्ट्र शासन यांचा लोगो टाकण्यास मान्यता दिलेली आहे. डिजिटल सातबारा उताऱ्यावर हे दोन्ही प्रकारचे लोगो नसतील तर तो उतारा बोगस असतो.
या तीन गोष्टींची पडताळणी करून तुम्ही सातबारा खरा आहे की खोटा याबद्दलची माहिती मिळवू शकता.

वाचा : Vivo Diwali Sale 2023 | X90, V29 आणि Y सीरीजवर मोठी सूट जाणून घ्या सविस्तर …

बोगस सातबारा ओळखण्यासाठी इतर काही उपाय
सातबारा उताऱ्यावर असलेल्या माहितीची काळजीपूर्वक पडताळणी करा. जमिनीचा क्षेत्रफळ, मालकाचे नाव, खरेदी-विक्रीची तारीख, फेरफारची तारीख, कर्जाची रक्कम इत्यादी माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करा.
सातबारा उताऱ्याची छायाप्रत बनवा आणि ती तुमच्या जवळच्या तहसीलदार कार्यालयात घेऊन जा. तिथे त्याची पडताळणी केली जाईल.
तुम्ही ई-महाभूमी या वेबसाइटवर जाऊनही सातबारा उताऱ्याची पडताळणी करू शकता.
बोगस सातबारामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे सावधगिरी बाळगूनच सातबारा उताऱ्याची पडताळणी करा.

हेही वाचा :

Web Title: Farmers, is your satbara real or bogus? Know in detail ‘this’ in a simple way in a pinch

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button