Weather Update | शेतकऱ्यांनो राज्यातील ‘या’ भागांत विजांसह पावसाची शक्यता; जाणून घ्या कुठे पडणार?
Weather Update | Farmers, chances of rain with lightning in 'these' parts of the state; Know where to fall?
Weather Update | राज्यातील दक्षिण भागात पावसाला पोषक हवामान निर्माण झाले आहे. त्यामुळे आज (ता. ८) दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील (Maharashtra Weather) काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान (Weather Update in Maharashtra) विभागाने वर्तविली आहे. कोकणात कमाल तापमान ३४ ते ३६ अंशांच्या दरम्यान असून, उर्वरित राज्यातही कमाल तापमानात वाढ-घट सुरूच आहेत.
मंगळवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये डहाणू येथे उच्चांकी ३६.१ अंश सेल्सिअस, उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३० ते ३५ अंशांच्या दरम्यान होते. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी काहीशी कमी झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात पुन्हा गारठा वाढू लागला आहे. मंगळवारी (ता. ७) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
वाचा : Buy Gold in Diwali | दिवाळीत सोने खरेदी करण्याचा विचार करत आहात? ही बातमी तुमच्यासाठी आहे!
पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. ८) दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, आग्नेय अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप बेटांजवळ समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे पूर्व-मध्य अरबी समुद्रात आज (ता. ८) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. वरील प्रणालीपासून दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे.
शेतकऱ्यांनी घ्यावी योग्य काळजी
पावसाच्या वेळी सुरक्षित राहण्यासाठी शेतात काम करताना योग्य काळजी घ्यावी.
पिकांवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होऊ नये याची काळजी घ्यावी.
पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी उपाययोजना करावी.
हवामान विभागाचा अंदाज काय?
आज (ता. ८) : दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस.
उद्या (ता. ९) : राज्यातील बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस.
पुढील पाच दिवस : राज्यात हलका ते मध्यम पाऊस.
हेही वाचा :
Web Title: Farmers, chances of rain with lightning in ‘these’ parts of the state; Know where to fall?