ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Government Scheme | शेतकऱ्यांना तारणारी राज्यसरकारची योजना ; नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना

भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार सतत नवनवीन योजना राबवित असते. महाराष्ट्र सरकारने २०२१ मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana) जाहीर केली. या योजनेसाठी ४००० कोटी खर्च करण्याच्या प्रस्तावला सरकारने मंजुरी दिली आहे. राज्यतील लघु व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांवर भर देणार आहे. तसेच या योजनेमुळे हवामान बदलांमुळे होणाऱ्या अडचणींमध्ये शेतकऱ्यांना मदत होणार आहे. राज्यातील १५ जिल्ह्यांमधील ५१४२ खेड्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राबविण्यात येणार आहे.

वाचा: पशूपालकांना दिलासा ! आता जनावरांना मिळणार हक्काचा निवारा; मनेरगा अंतर्गत होणार बंदिस्त पशुपालन

म्हणून सुरू केली योजना

सततच्या बदलत्या हवामानामुळे राज्यातील शेतकरी कोणत्या न कोणत्या अडचणीत सापडतात. अनेकदा शेतीसाठी पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. तसेच बरेच शेतकरी आत्महत्या देखील करतात. शेतकऱ्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना २०२१ सुरू केली होती.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना २०२१ चे फायदे

१) या योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यावरही लक्ष केंद्रित केले जाते.

२) राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी सरकारकडून ४००० कोटी रुपयांचा निधी पुरवला गेला आहे.

३) या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार राज्यातील दुष्काळग्रस्त भाग दुष्काळमुक्त करेल.

४) ही योजना सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात सुमारे २८०० कोटी रुपयांची आर्थिक मदत घेतली आहे.

आवश्यक कागदपत्रे व पात्रता

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. दरम्यान अर्ज करणारा हा महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा. या योजनेंतर्गत लघु व मध्यमवर्गीय शेतकरी पात्र ठरतील. अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

१) आधार कार्ड
२) पत्ता पुरावा
३) सरकारी ओळखपत्र
४) मोबाइल नंबर
५) पासपोर्ट साईझ फोटो

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Information about nanaji deshmukh krushi sanjivani yojana

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button