ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Vegetables preservation | भाज्या ताज्या ठेवण्याच्या सोप्प्या टिप्स ! एकदा वापरून बघाचं !

चांगल्या निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार ( Balanced Diet) घ्यावा लागतो. संतुलित आहारात सर्व अन्न घटकांचा समावेश असणाऱ्या भाज्यांचा समावेश होतो. भाज्यांमध्ये असणारे पोषक घटक शरीरासाठी फायदेशीर असतात. आपण बऱ्याचदा आठवड्याच्या भाज्या एकदमच घेतो. मात्र या भाज्या दीर्घकाळापर्यंत ताज्या ( Fresh) ठेवणे हे मोठे आव्हान असते.

भाज्या जमीनीतून बाहेर काढल्यानंतर म्हणजेच उपटल्यानंतर किंवा तोडल्यानंतर खूप पटकन खराब होऊ शकतात. मात्र जर तुम्ही त्या योग्य पध्दतीने साठवून ठेवल्या तर त्यांचे आयुष्य वाढू शकते. व्यवस्थित ठेवलेल्या भाज्या साधारण आठवडाभर टिकू शकतात. जाणून घेऊयात भाज्या ताज्या ठेवण्याच्या काही सोप्प्या टिप्स (Easy tips).

१. फक्त वापरण्यापूर्वी भाज्या धुवून घ्या.

खूपदा भाजी घरी आणल्यानंतर आपण लगेच धुण्यास घेतो. मात्र, यामुळे भाज्या पटकन खराब होतात. कारण पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर भाज्या लगेच वापरल्या नाहीत तर त्या लवकर खराब होतात. त्यामुळे भाज्या वापरण्यापूर्वीच धुणे महत्त्वाचे आहे. भाज्या कोरड्या असतील तरच त्या जास्त वेळ ताज्या राहतात.

२. भाज्या कोरड्या ठेवा

भाज्या ओल्या असतील तर त्या लवकर नासू शकतात. त्यामुळे भाज्यांना कोरडे ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. जेव्हा आपण भाज्या रेफ्रिजेटरमध्ये ठेवतो तेव्हा त्या कापडाने किंवा कागदाने गुंडाळून ठेवा, जेणेकरून त्या कोरड्या राहतील.

३. योग्य ठिकाणी योग्य भाज्या ठेवा

भाजी साठवण्यासाठी प्रत्येक भाजीची एक वेगळी पद्धत असते. काही भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्या जातात तर काही भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्या जात नाहीत. पालक, मेथी सारख्या पालेभाज्या फ्रिजमध्ये रेफ्रिजेट ड्रॉवरमध्ये ठेवाव्या तर बटाटे, बीट, कांदे हे अंधार असलेल्या ठिकाणी साठवून ठेवू शकता.

४. गरज असेल तेव्हाच भाज्या कापून ठेवा

जेव्हा आपण भाज्या कापून ठेवतो तेव्हा त्या लवकर खराब होतात. कारण, हवेच्या संपर्कात आल्यानंतर भाज्या फार काळ टिकत नाहीत. म्हणून, भाज्यांचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही भाज्या वापरणार असाल तेव्हाच त्यांना कापा. जर कापलेल्या भाज्या शिल्लक राहिल्या असतील तर त्या आठवणीने हवाबंद डब्यात ठेवून रेफ्रेजेरेटरमध्ये ठेवा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Some important vegetables preservation tips

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button