ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Department of Agriculture|शेतकऱ्यांनो पाऊस लांबला! कृषी विभागाने केले पेरणीबाबत आवाहन, जाणून घ्या किती पाऊस झाल्यावर करावी पेरणी?

Department of Agriculture | सध्या हवामानाचे चक्र बिघडले आहे. उन्हाळ्यात अवेळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या (Department of Agriculture) मनात पेरणीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अशातच हवामान विभागाकडून (Maharashtra Weather Forecast) लांबला असल्याची माहिती देण्यात आली आहे. ज्याचं कारण म्हणजे अरबी समुद्रात तयार होणारं बिपरजॉय चक्रीवादळ. म्हणूनच कृषी विभागाने (Department of Agriculture) शेतकऱ्यांना पेरणीबाबत आवाहन केले आहे.

वाचा: बिग ब्रेकिंग! खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ; केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

राज्यात पाऊस लांबला
गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्यामध्ये पाऊस झाला त्यामुळे शेतकरी राजा आनंदात होता. एकदा का पावसाला सुरुवात झाली की, शेतकरी आपल्या शेतात पेरणी करण्याचे काम सुरू करतात. त्यासाठी शेतकरी पावसाची वाटच बघत असतात. परंतु अशातच हवामान विभागाने राज्यामध्ये पाऊस लांबला असल्याची माहिती दिली. त्यामुळे शेतकऱ्यांचा हा आनंद टिकून राहिला नाही. आता शेतकऱ्यांनी कधी पेरणी करावी कृषी विभागाने काय आवाहन केले आहे हे पाहूया.

काय केले कृषी विभागाने आवाहन?
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. कमी प्रमाणात पडणाऱ्या पावसाच्या जीवावर शेती करणे चुकीचे आहे. त्याचबरोबर 80 ते 100 मिलिमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे आवाहन कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

शेतात पावसाच्या पाण्याने ओलावा धरला की, पेरणी केलेले बीज चांगल्या प्रमाणात उगवते. त्याचबरोबर पाऊस लागून राहिला की, पिक उगवणी चांगली होते, अन्यथा पावसामध्ये खंड पडल्यास पिके तग धरत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये. पुरेसा पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers, the rain is long! Agriculture department has appealed about sowing, know how much rain should be sown after?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button