ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Digital Ration card | भारीच की ! आता घरबसल्या काढता येणार डिजिटल रेशनकार्ड; जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

Digital Ration card | That's heavy! Know how to withdraw digital ration card now at home?

Digital Ration card | जळगाव जिल्ह्यात आता नागरिक घरबसल्या डिजिटल रेशनकार्ड काढू शकतील. तहसील कार्यालयाने यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत ६० नवीन रेशनकार्डधारकांना (Digital Ration card) ऑनलाइन डिजिटल कार्ड देण्यात आले आहे.

यामुळे नागरिकांना दलालांकडे जाण्याची किंवा तहसील कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही. तसेच, रेशनकार्डसाठी अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही. यामुळे दलालांकडून होणारी आर्थिक लूट थांबणार आहे.

डिजिटल रेशनकार्डची प्रिंट काढून ते आधारकार्डाप्रमाणे वापरता येणार आहे. यावर संबंधित लाभार्थी कोणत्या प्रकारचे रेशनकार्डधारक आहे, याची माहिती असेल. तसेच, त्या कुटुंबातील सदस्य संख्या आणि आधारकार्ड क्रमांक देखील असेल.

जळगाव जिल्ह्यात एक लाख २२ हजार ८५५ रेशनकार्डधारक आहेत. यापैकी १ लाख २२ हजार ४५५ रेशनकार्ड धारकांचे डिजिटलीकरण करण्यात येणार आहे.

वाचा : Ration Card | नागरिकांसाठी आनंदाची बातमी! आता रेशन कार्डशी संबंधित सर्व कामे करता येणार ऑनलाइन; जाणून घ्या एका क्लिकवर

दलालांना चाप बसणार

तहसील कार्यालयात रेशनकार्ड काढण्यासाठी दलालांची मोठी मंडळी कार्यरत आहेत. ते लाभार्थ्यांकडून रेशनकार्ड काढण्यासाठी सुमारे पाचशे ते दोन हजार रुपये उकळतात. यामुळे अनेकांनी तक्रारी केल्या होत्या.

डिजिटल रेशनकार्ड सुरू केल्याने दलालांना चाप बसणार आहे. आता नागरिकांना शासकीय शुल्कातच रेशनकार्ड मिळेल.

असे करा अर्ज

डिजिटल रेशनकार्डसाठी अर्ज करण्यासाठी, नागरिकांना https://mahafood.gov.in/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइटवर जाऊन, “ऑनलाइन रेशनकार्ड अर्ज” या पर्यायावर क्लिक करावे.

नंतर, आवश्यक ती माहिती भरून अर्ज सबमिट करावा. अर्जाची प्रिंट काढून, त्यावर स्वाक्षरी करून, संबंधित तहसील कार्यालयात किंवा सेतू केंद्र, सीएससी केंद्रात जमा करावा.

अर्जाची छाननी केल्यानंतर, संबंधित लाभार्थ्यांना डिजिटल रेशनकार्ड देण्यात येईल.

हेही वाचा :

Web Title : Digital Ration card | That’s heavy! Know how to withdraw digital ration card now at home?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button