कृषी तंत्रज्ञान

Maharashtra Farmers| स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही शेतकऱ्यांच्या वाटेत चिखलच, ‘या’ जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांची परिस्थिती बिकट

Maharashtra Farmers| आपण अनेक सडका बांधल्या, राष्ट्रीय महामार्ग बांधले. मात्र अजूनही अशी काही गावं, वाड्या, पाडे असे आहेत जिथं साधे रस्तेही नाहीत. महाराष्ट्रात गावागावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार व्हावेत यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना’ राबवण्यात येते. मनरेगांतर्गत मजुरी व प्रति एक किमी रस्त्याला 100 तास जेसीबी, खडीकरण, रस्ते मजबुतीकरण अशी योजना राबवण्यात येणार आहे.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

काय आहे जिल्ह्यातील स्थिती

कित्येक वर्षांपासून शेत पाणंद रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. पावसाळ्यात तर ह्या रस्त्यांवरून जाणं म्हणजे तारेवरची कसरत करावी लागण्यासारखं असतं. ही दुरावस्था दूर व्हावी यासाठी मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजने अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2 हजार 469 कामांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी 1534 कामं ग्रामपंचायत तर 776 कामं तहसील यंत्रणेमार्फत होणार आहेत. ग्रामपंचायतीतर्फे 449 कामं आणि तहसील यंत्रणांकडून 14 कामं सुरू झाली आहेत. यामुळं जिल्ह्यात ही योजना कासव गतीने सुरु असल्याचं दिसतं.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

आत्ताच कामे पूर्ण करा

शेतमालाला दर न मिळणं ही मोठी समस्या आहेच मात्र तो माल शेतातून बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे ही सुद्धा एक समस्या आहे. तसेच शेतीच्या मशागतीसाठी अत्याधुनिक यंत्रे शेतात घेऊन जाण्यातही फार मोठी समस्या उभी रहाते. जिल्ह्यातील अजून सहा तालुक्यात तहसील यंत्रणेकडे असलेली पाणंद रस्त्यांची कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. पावसाळा तोंडावर आला आहे. त्याआधी ही कामं पूर्ण व्हावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

मंजूर झालेली कामे
मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजने अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण 2 हजार 469 कामांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी 1 हजार 534 कामं ग्रामपंचायत तर 776 कामं तहसील यंत्रणेमार्फत होणार आहेत. ग्रामपंचायतीतर्फे 449 कामं आणि तहसील यंत्रणांकडून 14 कामं सुरू झाली आहेत. ग्रामपंचायत यंत्रणेने रस्त्यांच्या 1 हजार 206 कामांना तर तहसील यंत्रणेने 14 कामांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. ही कामे पावसाळ्याआधी पूर्ण व्हावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. अन्यथा स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतरही शेतकऱ्यांची वाट चिखलाचीच असं म्हणणं भाग आहे.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button