ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्य

High Fever | देशात नवीन आजाराचा कहर ! संपूर्ण गाव गूढ तापाच्या विळख्यात 500 हून अधिक आजारी

High Fever | A new disease in the country! Over 500 sick in whole village in mysterious fever

High Fever | दिल्लीच्या शेजारील गाझियाबाद जिल्ह्यातील भानेरा गावात गूढ तापाची साथ पसरली आहे. या तापाच्या विळख्यात सापडून आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून 500हून (High Fever) अधिक लोक रुग्णालयात दाखल आहेत.

या आजाराची माहिती मिळताच आरोग्य विभागाचे पथक गावात पोहोचले. पथकाने घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी केली. तपासणीत अनेक रुग्णांमध्ये डेंग्यू आणि विषाणू संसर्ग आढळून आला आहे.

आरोग्य विभागाचे पथक गावात स्वच्छता मोहीमही राबवत आहे. गावातल्या तलावांमधून पाणी काढून टाकण्यात येत आहे. तसेच, डासांची निर्मूलनासाठी औषधे फवारण्यात येत आहेत.

वाचा : Animal health scheme| साथीच्या आजारांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारची नवी योजना, या राज्यांना होणार लाभ; महाराष्ट्राच्या वाट्याला काय? वाचा सविस्तर

गावातल्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आरोग्य विभागाने आवाहन केले आहे.

या आजाराचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, गावाशेजारी काही तलाव असून तेथे पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था नसल्याचे समजते. तलावातील पाणी कुजल्याने डासांचा प्रादुर्भाव होऊन रोगराई पसरल्याचे बोलले जात आहे.

आरोग्य विभागाच्या पथकाने गावात तळ ठोकून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

हेही वाचा :

Web Title : High Fever | A new disease in the country! Over 500 sick in whole village in mysterious fever

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button