ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Tractor Scheme | आनंदाची बातमी! दसऱ्यापसून राज्यात अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना सुरू; 15 लाखांपर्यंत ‘असा’ घ्या लाभ

Good news! Annasaheb Patil tractor scheme started in the state from Dussehra; Get 'Asa' benefits up to 15 lakhs

Tractor Scheme | मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत विविध योजना राबवल्या जातात. या योजनांमधील ट्रॅक्टर (Tractor Scheme) खरेदी योजनेची मर्यादा वाढवून आता 15 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. तसेच, या योजनेअंतर्गत येत्या दसऱ्यापासून लाभार्थ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर सवलत मिळणार आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत स्थगित असलेली ट्रॅक्टर खरेदी प्रकरणे पुन्हा सुरु करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. येत्या दसऱ्यापासून ट्रॅक्टर खरेदी सवलतीला सुरुवात होणार आहे. यासाठी महिंद्रा आणि एस्कॉट टर्बो या दोन कंपन्यासोबत सामंजस्य करार (एमओयू) करण्यात येणार आहे.

वाचा : VJNT Loan Scheme | काय सांगता? ‘या’ योजनेंतर्गत व्यवसायासाठी मिळतंय 1 लाखांच बिनव्याजी कर्ज, जाणून घ्या पात्रता

ट्रॅक्टरच्या किमतीच्या 50 टक्के व्याज परतावा
ट्रॅक्टर खरेदी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ट्रॅक्टरच्या किमतीच्या 50 टक्के व्याज परतावा महामंडळाकडून दिला जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा, त्याचे वय 18 ते 45 वर्षे असावे आणि त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. लाभार्थीने किमान 10वी उत्तीर्ण केलेली असावी आणि त्याला किमान 10,000 रुपयांचे स्वयंरोजगाराचे प्रकल्प असावे. महामंडळाच्या योजनांची जनजागृती राज्यामध्ये गावपातळीपर्यंत करण्याच्या उद्देशाने जिल्हानिहाय दौरे, मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले असून राज्यातील विविध तालुक्यांमध्ये या माध्यमातून महामंडळाच्या योजनांची प्रचार-प्रसिध्दी करण्यात येत आहे.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
लाभार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने महामंडळाच्या योजनांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-1) अंतर्गत कर्ज मर्यादा रु. 10 लाखांवरुन रु. 15 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर 3 लाख रुपयांच्या मर्यादेत करण्यात येणाऱ्या व्याज परताव्याची मर्यादा 4.5 लाख रुपयांपर्यंत वाढवून कर्ज कालावधी 5 वर्षांहून 7 वर्षापर्यंत वाढविला आहे. महामंडळाच्या योजनेअंतर्गत सर्वाकरिता वयोमर्यादेची अट 60 वर्षापर्यंत वाढविण्यात आली आहे.

भविष्यात महामंडळाच्या माध्यमातून अधिकाधिक संख्येने मराठा तरुण उद्योजक तयार करण्याचे ध्येय असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले. या योजनेमुळे मराठा समाजातील तरुणांना शेती पूरक व्यवसायासाठी ट्रॅक्टर खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळेल. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.

हेही वाचा :

Web Title: Good news! Annasaheb Patil tractor scheme started in the state from Dussehra; Get ‘Asa’ benefits up to 15 lakhs

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button