ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Farmers Scheme| अपघातग्रस्त शेतकऱ्यांसाठी नवी योजना लागू, याअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार ‘इतका’ लाभ; जाणून घ्या सविस्तर

Farmers Scheme|शेतकऱ्यांसाठी चालू असलेली शेतकरी अपघात विमा बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्याऐवजी आता बुधवारपासून ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ राज्यभर लागू करण्यात आली आहे. जुनी शेतकरी अपघात विमा योजना विमा कंपन्यांकडून नीट राबवली जात नव्हती. दावे वेळेत मंजूर न करणं, काहीतरी त्रुटी काढून दावे नाकारण्याचे प्रकार होत असल्याचं कृषी खात्याचे म्हणणं होतं. म्हणून राज्य शासनानं आधीची विमा योजना बंद करून अनुदान योजना सुरू केली आहे. मात्र शासनाच्या अन्य विभागाकडून अपघातग्रस्तांसाठी चालू असलेल्या योजनेचा लाभ घेतल्यास नव्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

काय होती जुनी योजना

जुन्या विमा योजनेनुसार अपघातग्रस्त शेतकऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते. त्यासाठी स्वतः खातेदार शेतकरी तसेच त्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य म्हणजेच आई-वडील, शेतकऱ्याची पत्नी-पती, मुलगा किंवा अविवाहित मुलगी यापैकी एक अशा एकूण दोन जणांना गेल्या पाच वर्षांपासून विमा कवच दिले जात आहे. मात्र विमा कंपन्या ही योजना व्यवस्थित राबवत नाहीत असं कृषी विभागानं म्हटलं आहे. विमा कंपन्या शेतकऱ्यांना त्रास देत असल्यामुळंच नवी अनुदान योजना लागू करण्यात आली आहे.

अशी आहे नवी अनुदान योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना असं या नव्या योजनेचं नाव आहे. यानुसार
शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, रस्ता किंवा रेल्वे अपघात, विषबाधा, पाण्यात बुडून मृत्यू, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, उंचावरून पडून झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या खाल्ल्यामुळे, चावण्यामुळे जखमी होणे किंवा मृत्यू, दंगल, अन्य कोणतेही अपघात तसेच अपघाताच्या व्याख्येनुसार कोणत्याही अनपेक्षित, आकस्मिक दुदैवी अपघातामुळे होणारे मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास सदर योजनेतून अपघातग्रस्त शेतकरी किंवा शेतकऱ्याच्या वारसदारास सदर योजनेतून लाभ देण्यात येणार आहे.

हा मिळणार लाभ

अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये तर अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास 2 लाख रुपये या अनुदान योजने अंतर्गत मिळणार आहेत. तसंच अपघातामुळं एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास 2 लाख रुपये मिळणार आहेत. अपघातामुळं एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास 1 लाख रुपये या योजने अंतर्गत देण्यात येणार आहेत. नैसर्गिक मृत्यू, आत्महत्या इत्यादी कारणांसाठी या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अपघात घडल्यानंतर 30 दिवसांत प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे. त्यानंतर त्याची तपासणी करून त्वरित मदत देण्याची कार्यवाही तालुका स्तरीय समिती करणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button