ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Falbag Lagwad Yojana | फळबाग लागवड करणे झाले सोप्पे ! सरकारने आणली ‘ही’ नवीन योजना

Falbag Lagwad Yojana |शेती व शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. सध्या राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड (Fruit Farming) योजना राबविण्यात येत आहे. यामुळे फळबाग लागवडीला चालना मिळणार असून उत्पादनात वाढ होणार आहे.

फळबाग लागवड योजना

राज्यामध्ये फळबाग लागवडीच्या माध्यमातून लागवडीखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ करणे, शाश्वत रोजगार निर्मिती करुन स्थानिक पातळीवर पूरक व्यवसायात वाढ करणे व फलोउत्पादन वाढविणे हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना सर्व जिल्ह्यांच्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येणार असून याअंतर्गत जून ते मार्च या कालावधीत लागवड करण्यात येईल. (Falbag Lagvad Yoajana)

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

योजनेअंतर्गत या झाडांची करा लागवड

फळबाग लागवड योजनेअंतर्गत लाभार्थीस शंभर टक्के अनुदानावर सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर खालीक झाडांची लागवड करता येते.

१) फळझाडे
२) वृक्ष
३) फूलपिके
४)मसाला पिके
५) औषधी वनस्पती

झाडांची नावे

या योजने अंतर्गत आंबा, काजू, चिकू, पेरु, डाळींब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, नारळ, बोर, सिताफळ, आवळा, चिंच, कवठ, जांभूळ, अंजीर कलमे, साग, गिरीपुष्प, सिंधी, शेवगा, हादगा, बांबू, जट्रोफा, कडीपत्ता, पानपिंपरी, करंज व इतर औषधी वनस्पतींचा समावेश आहे. तसेच नवीन फळपिकांमध्ये द्राक्ष, ड्रॅगनफ्रूट, ॲव्होकॅडो, केळी (३वर्ष) या पिकांचा समावेश आहे. याशिवाय फूल पिकामध्ये गुलाब, मोगरा, निशीगंध, सोनचाफा या पिकाचा समावेश आहे. मसाला पिकामध्ये लवंग, दालचिनी, जायफह, मिरी या पिकांचा समावेश आहे.

Eligiblity | योजनेसाठी आवश्यक पात्रता व अटी

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

१) लाभधारकाच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे.
२) लाभार्थी जॉबकार्ड धारक व अल्प, अत्यल्प भूधारक असावा.
३)जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास व सातबाराच्या उताऱ्यावर जर कुळाचे नाव असले तर योजना कुळाच्या संमतीने राबविण्यात यावी.
४)योजनेतील लाभार्थ्यांनी लागवड केलेल्या फळझाडे, वृक्षांच्या दुसऱ्या वर्षी किमान ९० टक्के व तिसऱ्या वर्षी ७५ टक्के फळझाडे, वृक्ष जिवंत राहिले पाहिजे.

योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास

फळबाग लागवड योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ०.२० हेक्टर ते २.०० हेक्टर क्षेत्राचे मर्यादेत फळझाड लागवड करता येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या गावातील कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

Government announced new scheme for fruit farming

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button