ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Girl Free Education | शिक्षणाचा झंझावात! 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मुलींसाठी मोफत शिक्षण! जाणून घ्या सविस्तर …

Girls Free Education | The struggle of education! Free education for girls with income less than 8 lakhs! Know more...

Girl Free Education | शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणणारी बातमी! राज्यातील 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मुलींसाठी जून महिन्यापासून मेडिकल, इंजिनिअरिंग आणि इतर 600 अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत होणार आहे. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात ही घोषणा केली.

या योजनेत इंजिनिअरिंग, मेडिकल सारख्या महागड्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. ज्यासाठी सामान्य घरातील मुलांना शिक्षण घेणे अत्यंत कठीण होते. आता मात्र, या योजनेमुळे अशा मुलींच्या शिक्षणाची (Girl Free Education) दारे उघडणार आहेत.

दुसरीकडे, चंद्रकांत पाटील यांच्या घोषणेनंतर मुलांमध्ये नाराजी पसरली आहे. कार्यक्रम संपल्यानंतर काही मुलांनी पाटील यांना अडवून फक्त मुलींनाच मोफत का, या उत्पन्नाखालील मुलांना देखील मोफत (School) शिक्षण द्यावे, अशी मागणी केली. यावर पाटील यांनी मुलांची मागणी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्याचे आश्वासन दिले.

वाचा | New Hostel Open | उसतोड मजुरांच्या मुलांसाठी ६२ वसतिगृहे सुरू होणार; पण कुठे, वाचा सविस्तर…

योजनेचे फायदे:

  • 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मुलींसाठी 600 अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश.
  • मेडिकल आणि इंजिनिअरिंग सारख्या महागड्या अभ्यासक्रमांमध्ये मोफत प्रवेश.
  • शिक्षणाच्या क्षेत्रात लैंगिक समानता वाढण्यास मदत.
  • सामान्य घरातील मुलींसाठी उच्च शिक्षणाची दारे उघडणे.

मुलांची नाराजी:

  • फक्त मुलींसाठीच मोफत शिक्षण का?
  • या उत्पन्नाखालील मुलांनाही मोफत शिक्षण द्यावे.
  • लैंगिक भेदभाव टाळावा.

Web TItle | Girls Free Education | The struggle of education! Free education for girls with income less than 8 lakhs! Know more…

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button