Crop Insurance | १ रुपयात विमा; शेतकऱ्यांनो, आता रब्बी हंगामासाठी विमा घेऊनच बघा ! जाणून घ्या त्वरित …
Crop Insurance | Insurance for 1 rupee: Farmers, now get crop insurance for Rabi season! Find out instantly...
Crop Insurance | महाराष्ट्र सरकारने रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना १ रुपयात विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करता येईल.
खरीप हंगामात १ रुपयात विमा योजनेचा (Crop Insurance) शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे रब्बी हंगामातही ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा, रब्बी कांदा, उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमूग या पिकांचा विमा शेतकऱ्यांनी घेऊ शकतात.
शेतकरी हिश्श्याची विमा हप्ता रक्कम राज्य सरकार भरणार आहे. रब्बी ज्वारीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत, तर गहू (बागायत), हरभरा, रब्बी कांदा या पिकांसाठी १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील. उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकासाठी ३१ मार्चपर्यंत सहभागी होता येईल.
पुणे, हिंगोली, अकोला, धुळे व धाराशिव जिल्ह्यासाठी एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कं. लि. या विमा कंपनीमार्फत योजना राबविण्यात येणार आहे. सातारा, नगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव जिल्ह्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. या विमा कंपन्यांच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे.
वाचा : Manjiri of Tulsi | तुळशीची मंजीरी ठेवल्याने घरात काय घडते, या 5 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
पाटीलांच्या पाठपुराव्याने ३७८ कोटींची नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत ३७८ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळणार आहे. याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील यांनी पाठपुरावा केला होता.
यावर्षी केळी उत्पादक शेतकऱ्यांना हवामानाच्या अनियमिततेमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी पाटीलांनी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम लवकरच जमा होणार आहे.
हेही वाचा :
Web Title : Crop Insurance | Insurance for 1 rupee: Farmers, now get crop insurance for Rabi season! Find out instantly…