ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

E-Chawadi | आता शेतकऱ्यांना ऑनलाईन भरता येणार शेतसारा, जाणून घ्या प्रक्रिया अन् फायदे

पूर्वी शेतीबाबत कोणतीही कामे करायची म्हटलं की, कार्यालयाच्या खेट्या घालाव्या लागत असे. मात्र, आता काळाप्रमाणे सर्वच गोष्टींमध्ये बदल झाला आहे.

E -Chawdi | सध्याचं डिजिटल युग (Digital age) आहे मग शेती संबंधित कामे तरी कशी मागे राहतील. आता शेतीची (Agriculture) कित्येक कामे ही ऑनलाईन स्वरूपातच (Agriculture Online Works) होतात. इतकचं नाही तर शेतीतील पिकाची पाहणी करण्यासाठी देखील ई-पीक पाहणी हे ऍप विकसित करण्यात आले आहे. ज्यामुळे आता अधिकाऱ्यांना ऑनलाईन पीक पाहणी करता येत आहे. त्याचमुळे ही कामे जलदरित्या होत आहे. त्याचवेळी आता सातबारा देखील शेतकऱ्यांना ऑनलाईन काढता येत आहे. त्यामध्ये असणाऱ्या चुका देखील ऑनलाईन दुरुस्त करता येत आहेत. आता या ऑनलाईन सुविधांसह शेतकऱ्यांना आणखी एका सुविधेचा लाभ मिळणार आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात.

काय आहे ई-चावडी उपक्रम?
आता शेतकऱ्यांसाठी ई-चावडी उपक्रम राबवण्यात येत आहे. ऑनलाईन पीक पाहणी आणि सातबारा याप्रमाणेच शेतकऱ्यांना ई-चावडीचा देखील फायदा होणार आहे. ई -चावडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतजमिनीसह, अकृष जमिनींचा महसूल भरता येणार आहे. यासाठी ई पोर्टलचे काम सुरू असून, ही सेवा शेतकऱ्यांच्या सेवेत 1 ऑगस्टपासून येणार आहे.

वाचा: Kharif Season | लांबलेल्या पावसाचं ओझ शेतकऱ्याच्या डोक्यावर! थेट पीक कर्जावर होणार परिणाम, कसा तो वाचा सविस्तर…

वाचा: Wheat | तूर्कीने नाकारलेला शेतकऱ्यांचा गहू पुन्हा पोहोचणार सातासमुद्रापार! भारतीय गव्हाला ‘या’ देशांकडून मोठी मागणी

कसा भराल शेतसारा?
• शेतकऱ्यांकडून शेतसारा भरण्यासाठी तलाठी मध्यस्थी राहतील.
• सदर खातेदाराला तलाठ्यांकडून प्रथम नोटीस पाठवली जाईल.
• यानंतर ई-चावडी प्रकल्पांमधील नागरिकांची तलाठी कार्यालयात सदर नोटीस दिसणारं आहे.
• त्याचवेळी या नोटीसवर क्लिक करुन शेतकऱ्यांना रक्कम अदा करता येईल.
• झा शेतकऱ्यांनो शेतसारा भरला आहे त्या रकमेची पावती शेतकऱ्यांना मिळेल.
• त्यानंतर तलाठी हा जमा झालेला शेतसारा महसूल प्रशासनाकडे जमा करतील.
अशाप्रकारे शेतकऱ्यांना शेतसारा भरावा लागेल. त्यानंतर ही प्रक्रिया सुरू होईल आणि शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची रक्कम अदा करण्यात येईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button