ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Farm Subsidy | राज्य सरकारचा मोठा निर्णय! ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेसाठी लॉटरी पद्धत बंद, फक्त अर्जासोबत ‘ही’ कागदपत्रे जोडून शेतकऱ्यांना मिळणारं लाभ

Farm Subsidy | दुष्काळी परिस्थितीत आणि पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी शेततळ्याचा अवलंब करतात. शेततळ्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो. शेतीमधील वाहून जाणाऱ्या पाण्याचा योग्य प्रकारे साठवणूक करून हे शेततळे तयार केले जाते. मात्र, याच शेततळ्यासाठी खूप खर्च येतो. म्हणूनच अनेकदा शेतकरी करण्याकडे कानाडोळा करतात. म्हणूनच राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी अनुदान (Farm Subsidy) दिले जात आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

Ask him to stop the lottery system for the farm scheme | मागेल त्याला शेततळे’ योजनेसाठी लॉटरी पद्धत बंद
मागेल त्याला शेततळे या योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेततळ्यासाठी आता लॉटरी पद्धत बंद करून सर्व अर्जदार शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा हा निर्णय ऐतिहासिक ठरणार आहे. तर दुसरीकडे कोरोना काळामध्ये ही योजना दोन वर्षे बंद झाली होती. याबाबत अधिवेशनात शेततळ्याचा मुद्दा मांडल्यानंतर पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली आहे.

वाचा : Farm | शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीतून मिळणारं भरघोस उत्पन्न; सरकारच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा घ्या लाभ, जाणून घ्या पात्रता

Subsidy for Individual Farms | वैयक्तिक शेततळे अनुदान
देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयामुळे प्रत्येक गरजू To the farmerयोजनेच्या लाभासाठी पात्र करण्यात येणार आहे. त्यामुळे तळागाळातील शेतकऱ्यांना या शेततळ्याचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून वैयक्तिक शेततळ्यासाठी अनुदान दिले जाते. शेततळ्यासाठी ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी अर्ज करू शकतात.

Documents Required for Individual Farm| वैयक्तिक शेततळ्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • जमिनीचा सात-बारा उतारा (शेतकऱ्याच्या नावे किमान 60 गुंठे जमीन असावी)
  • लाभधारक शेतकऱ्याचे आधारकार्ड बंधनकारक आहे.
  • बॅंक पासबुक आणि हमीपत्राचेही बंधन
  • मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला द्यावा लागणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big decision of the state government! Lottery system closed for ‘Magel Aye Shetale’ scheme, benefits to farmers only by attaching ‘these’ documents along with the application

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button