शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता मागेल त्याला मिळणार शेततळे; - मी E-शेतकरी
योजना

Subsidy | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता मागेल त्याला मिळणार शेततळे; अनुदानातही झाली ‘इतकी’ वाढ

Subsidy | दुष्काळी परिस्थितीत आणि पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी शेततळ्याचा अवलंब करतात. शेततळ्याचा शेतकऱ्यांना (Farming) खूप फायदा होतो. शेतीमधील (Agriculture) वाहून जाणाऱ्या पाण्याचा योग्य प्रकारे साठवणूक करून हे शेततळे तयार केले जाते. यासाठी शेतकऱ्यांना शासन अनुदान (Subsidy) देते. तत्कालीन भाजपा -शिवसेना युती सरकारची ‘मागेल त्याला शेततळ्याची योजना’ ही शेतकऱ्यांसाठी प्रचंड उपयुक्त ठरली होती. जी आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

वाचा: बिग ब्रेकिंग! शेतकऱ्यांना सहज मिळणार पीक कर्ज; ‘ही’ जाचक अट रद्द करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मागेल त्याला शेततळे योजना
तत्कालीन भाजपा – शिवसेना युती सरकारची ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केली होती. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या (Department of Agriculture) साधनात वाढ होईल हा या योजनेचा उद्देश होता. जेणेकरून शेतकऱ्यांना शेततळ्यामुळे पाण्याची कमतरता भासणार नाही. त्यामुळेच सरकारने ‘मागेल त्याला शेततळे’ याची योजना सुरु केली होती. शेतकरी (Type of Agriculture) ऑनलाइन स्वरूपात ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

वाचा: पांढऱ्या सोन्याला येणार अजून झळाळी! बाजारात ओस पडल्याने व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात

शेततळे अनुदानात झाली वाढ
आता शेतकऱ्यांसाठी (Vertical Farming) ‘मागेल त्याला शेततळे योजना’ पुन्हा सुरू करण्यात आली आहे. हे शेततळे खोदण्यासाठी शेतकऱ्यांना गुंठ्यानुसार 25 ते 75 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. यापूर्वी या योजनेसाठी कमी अनुदान मिळत होते. ज्यात आता तब्बल 25 हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना (Agricultural Information) शेततळ्यासाठी वाढीव अनुदान मिळणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for farmers! If he asks now, he will get a farm; There has been ‘so much’ increase in subsidy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button