ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Loan Repayment|खुशखबर ! शेतकऱ्यांच्या कर्जाच्या थकबाकीची चिंता मिटली; सरकारने ‘या’ योजनेला मुदतवाढीसह दिली मंजुरी…

Loan Repayment|नागरी सहकारी बँका या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कण आहेत. या बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज पुरविले जाते. दरम्यान मागील काही वर्षांत शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले. यामुळे बहुतेक शेतकऱ्यांचे कर्ज (Loan Repayment ) थकीत आहे. दिवसेंदिवस हा थकबाकीचा आकडा वाढतच चालला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट समोर आली आहे.

एकरकमी कर्ज परतफेड योजना

नागरी सहकारी बँकांकडे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांकडून थकीत कर्ज वसुली व्हावी यासाठी एक योजना राबविण्यात आली आहे. थकबाकी कर्ज वसुलीसाठी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी शासनास शिफारस केली होती व त्याप्रमाणे एकरकमी कर्ज परतफेड योजना राबवण्यासाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे.

वाचा: शेतकरी खुश ! मे महिन्यात खात्यात जमा होणार ४ हजार रुपये; ‘या’ योजनेचा सुद्धा मिळणार लाभ

३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ

महत्त्वाची बाब म्हणजे एकरकमी कर्ज परतफेड योजनेत मुदतवाढ मिळावी यासाठी नागरी सहकारी बँकांनी मागणी केली होती. ही मागणी सुद्धा मान्य झाली असून एकरकमी कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत ही मुदतवाढ असणार आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ( extended date for one time settelement)

योजनेचे स्वरूप

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्जदाराने अर्ज सादर (loan application) करणे आवश्यक आहे. यावेळी ज्या दिवशी तुमचे कर्जप्रकरण अनुत्पादक कर्जाच्या संशयित एक या वर्गवारीत वर्गीकृत केले असेल, त्या दिवशीच्या लेझर बॅलन्सच्या म्हणजेच मुद्दल अधिक व्याज ( interest) याच्या किमान पाच टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे. यानंतर अर्ज मंजुरीचे पत्र मिळाल्यानंतर कर्जदाराने एका महिन्यात तातडीने सर्व थकबाकी रक्कम भरणे आवश्यक आहे.

Eligible loan accounts | योजनेसाठी पात्र कर्जदार

१) ज्या कर्जदारांच्या 31 मार्च 2022 अखेरची कर्ज खाती अनुत्पादक कर्जाच्या संशयित किंवा त्यावरील वर्गवारीत समाविष्ट केलेली असतील, अशा प्रकारच्या सर्व कर्ज खात्यांना ही योजना लागू होणार आहे.

२) दिनांक 31 मार्च 2022 अखेर अनुत्पादक कर्जाच्या सबस्टँडर्ड वर्गवारीमध्ये समावेश झालेल्या आणि त्या नंतर संशयित व बुडीत वर्गवारीत गेलेल्या कर्ज खात्यांना सुद्धा ही योजना लागू होणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Deatils about one time settlement bank loan scheme for farmers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button