अनेक शेतकरी फुलांची शेती (Floriculture) करण्याकरता प्राधान्यक्रम देतात. तुम्हीला कमी वेळेत अधिक उत्पन्न मिळवून देणारे उत्पादन म्हणून फुलांचे शेतीकडे पाहिले जाते. झेंडूसारखी (Like marigold) फुले दसरा, दिवाळी या काळात शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आर्थिक (Financial) लाभ प्राप्त करून देतात. अशाच एका फुलाच्या शेती बद्दल आपण माहिती पाहणार आहोत.
वैशिष्ट्ये :
‘चमेली’ (Jasmine) हे अत्यंत सुवासिक फुल आहे, त्याच्या सुगंधी गुणधर्मामुळे (Due to its aromatic properties) बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी राहत असते. चमेली फुलाच्या साह्याने उत्कृष्ट दर्जाचे परफ्युम (Perfume) देखील तयार होते त्यामुळे शेतकऱ्यांना फुल शेती करताना अत्यंत चांगला पर्याय असू शकतो.
सध्या भारतामध्ये चमेलीच्या 75 पेक्षा अधिक जाती उपलब्ध आहेत यापासून कॉस्मेटिक (Cosmetic) परफ्यूम तसेच ‘आयुर्वेदिक चहा’ (Ayurvedic tea) तयार करतात. त्याच प्रमाणे चमेली पासून साबण, तेल (Soap, oil) याची देखील निर्मिती केली जाऊ शकते.
चमेली चे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे एकदा वृक्ष लागवड झाल्यास दहा वर्षापर्यंत आपणास त्यापासून उत्पन्न म्हणजेच फुले मिळू शकतात. शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या देखील ही फुले अत्यंत फायदेशीर ठरतात.
हवामान:
चमेलीसाठी उष्णकटिबंधीय आणि सौम्य हवामान अत्यंत फायदेशीर ठरते तसेच हे झाड आपण कुठेही लावू शकतो उदाहरणार्थ बालकनी, परसबाग, अत्यंत छोट्या जागेत देखील याचे वृक्ष येऊ शकते परंतु व्यावसायिक दृष्ट्या विचार केल्यास शेतकरी ग्रीनहाऊस (Greenhouse) आणि पॉली हाऊसमध्ये(In Polly House) चमेलीचे फुल वाढवणे शेतकऱ्यांना जास्त पसंत करतात.
लागवड:
चमेलीची लागवड करताना चांगले निचरा आणि वालुकामय चिकण मातीमध्ये चांगले वाढते जमिनीचे पीएच मूल्य 6.5 ते 7.5 दरम्यान असावे या जमिनीमध्ये चमेलीची चांगली वाढ होऊ शकते.
चमेलीची लागवड करताना दोन, तीन वेळा चांगली नांगरणी करणे आवश्यक आहे यानंतर शेतात 30 सेमी लांब, रुंद आणि खोल खड्डा तयार करावा. मातीजन्य रोगांसाठी 15 ते 20 दिवस उन्हात खड्डे सोडा या खड्ड्यामध्ये शेणखत (Manure) टाकल्यास चमेलीचा फायदेशीर ठरते. पाणी व्यवस्थापन करताना ठिबक सिंचनाचा (Of drip irrigation) उपयोग केल्यास कमी पाण्यामध्ये अधिक उत्पन्न मिळवून देणारे हे पीक ठरेल.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :
मत्स्यपालना’ सोबत करा, ‘बदकपालन’ आणि मिळवा दुहेरी फायदा चला जाणून घेऊया
जाणून घ्या, कसे कराल सोयाबीन पिकावरील चक्रीभुंग्याचे किड व्यवस्थापन…