अकोले : गेल्या वर्षीपासून सोयाबीनला (To soybeans) चांगला बाजार भाव (Market price) मिळत आहे, मागील वर्षी सोयाबीनला चार हजार प्रति क्विंटल बाजार भाव होता मात्र हा बाजार भाव वाढून चक्क या वर्षी सोयाबीन प्रतिक्विंटल दहा हजार शंभर रुपये पर्यंत येऊन पोहोचले आहे त्यामुळेच गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांच्या ( farmers) कष्टाचे खऱ्या अर्थाने सोयाबीन सोने (Gold) केले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
अकोला बाजार समितीमध्ये (In Akola Market Committee) सोयाबीनला उच्चांकी बाजारभाव मिळाला प्रतिक्विंटल दहा हजार शंभर रुपये पर्यंत सोयाबीनने उसळी मारली त्यामुळे पुढील काळातील सोयाबीनला देखील चांगला बाजार भाव मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात बहुतांश ठिकाणी पाण्याची कमतरता असल्यास सोयाबीन पिकाची निवड केली जाते मात्र दुष्काळ, अतिवृष्टी, किडीचा प्रादुर्भाव अश्या नैसर्गिक कारणामुळे सोयाबीन उत्पादनामध्ये घट होताना दिसून येते, मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने सोयाबीन चांगलाच बाजार भाव मिळताना दिसून येत आहे त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय (International) स्तरावर देखील तेलाचे बाजार भाव वाढल्याने ही भाववाढ पाहायला मिळत आहे.
सोयाबीन उत्पादकांच्या पुढे अनेक प्रश्न उपस्थित असतात, शासनाच्या हमीभाव केंद्रावर सुद्धा सोयाबीन विक्री करताना शेतकऱ्यांना विविध अटी, शर्तीची पूर्तता करावी लागते किंवा शेतकरी व्यापाऱ्यांना अल्पदरातही त्यांचे सोयाबीन विकायला तयार होतात मात्र गेल्या दोन वर्षापासून सोयाबीनने खर्या अर्थाने शेतकऱ्यांना आर्थिक लाभ प्राप्त करून दिल्यामुळे यंदा देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन उत्पादनाला प्राधान्य दिले आहे.
राज्यनिहात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे बाजार भाव दर पाहण्यासाठी खाली क्लिक करा..
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :
जाणून घ्या, कसे कराल सोयाबीन पिकावरील चक्रीभुंग्याचे किड व्यवस्थापन…
कपाशीवरील तुडतुडे किडींवर नियंत्रण कशाप्रकारे करावे, नुकसान टाळण्यासाठी आहे तुमच्या फायदेचा सल्ला…