बाजार भाव

Cotton Rate | कापूस उत्पादकांच्या तोंडचा घास हिरावणार! ‘या’ कारणांमुळे कापसाचे दर होणार कमी

Cotton Rate | सध्या बाजारात कापसाला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आनंदात आहेत. कापसाच्या दराबाबत (Cotton Rate) सुरुवातीला थोडे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, दिवाळीनंतर कापसाच्या दरात (Financial) चांगली वाढ व्हायला लागली आहे. तर दुसरीकडे यंदा कापसाचे उत्पादन जवळपास 12 टक्क्यांनी वाढले आहे. परंतु आता बाजारात कापसाला (Agriculture) मिळणारं हा दर असाच टिकून राहू शकतो का? असा प्रश्न उभा राहिलाय. पण कापसाचे (Farming) दर कमी होऊ शकतात. ज्याचे काय कारण आहे ते सविस्तर जाणून घेऊया.

दर कमी होण्याची कारणे:-
कापूस उत्पादन
यंदा मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेती (Department of Agriculture) पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचवेळी कापूस देखील या पावसात झोडपून निघाला आहे. याच पार्श्वभूमीवर यंदा कापसाचे उत्पादन कमी होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, यंदा कापूस लागवडीत वाढ झाली आहे.

कापसाच्या उत्पादनात वाढ
यंदा कापसाचा पेरा वाढल्याने याचा परिणाम कापसाच्या उत्पादनावर होताना दिसून येत आहे. त्याचबरोबर हवामान अनुकूल नसूनही कापसाची (Cotton) गुणवत्ता देखील चांगली होती. ज्यामुळे कापसाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. हवामान (Weather) अनुकल नसताना देखील कापूस उत्पादनात 12 टक्यांनी मोठी वाढ झाली आहे.

कापूस दराचा निर्यातीवर परिणाम
खरं तर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या महिन्यामध्ये भारतातील कापसाच्या (Type of Agriculture) गाठी परदेशामध्ये निर्यात केल्या जातात. मात्र, यावर्षी भारतीय कापसाचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराहून अधिक असल्यामुळे त्याचा फटका निर्यातीला बसत आहे.

निर्यातीमुळे होणार दरावर परिणाम
भारतील कापसाचे दर आंतरराष्ट्रीय बजारापेशा जास्त आहेत. तर तुलनेत इतर देशांतील कापसाचे दर कमी आहेत. त्यामुळे भारतीय कापसाच्या (Department of Agriculture) निर्यातीला उठाव मिळत नाहीये. याच कारणामुळे देशातील कापसाची आवक टिकून राहू शकते. ज्याचा परिणाम दरावर होऊन दर कमी होऊ शकतात. गतवर्षी 2021-22 मध्ये 43 लाख कापसाच्या गाठींची निर्यात झालेली. जी यावर्षी फक्त 30 लाख होण्याचा अंदाज आहे. याच कारणास्तव देशातंर्गत कापसाचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Cotton producers will lose their mouths! Due to reasons cotton prices will be low

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button