
गेल्या दोन वर्षांपूर्वी मिरची बाजार तेजीत आहे. यंदा ही दरामध्ये चांगलीवाढ झाली आहे मिरचीमध्ये एक नवीन उच्चांक पाहायला मिळाला मिरची उत्पादक प्रदेशांमध्ये पाऊस झाल्यामुळे मिरचीच्या आवकेत घट झाली आहे. त्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा होऊ शकत नाही. यंदा घाऊक बाजारात मात्र मिरचीला 80 हजार ते कमाल दीड लाखापर्यंतचा दर मिळत आहे. यंदा मिरचीचा दाराचा ठसका जोरदार चाललेला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात झालेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी मिरचीचे नुकसान झाले आहेत. त्यामुळे मिरचीचे व्यवस्थापन बिघडले गेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही परिणामी बाजारपेठांमध्ये मिरचीची कमतरता वाढल्यामुळे मिरचीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
संकेश्वरी मिरची बरोबरच पश्चिम महाराष्ट्रात ब्याडगीस गंटूर, लवंगी या मिरचीच्या दरात ही वाढ पाहायला मिळाली. सध्या अणेगिरी, ब्याडगीस या मिरचीला क्विंटल मागे 29 हजार ते 31 हजार रुपयापर्यंत दर आहे. तसेच गंटूर मिरचीला क्विंटल मागे 12000 ते 15000 रुपये पर्यंतचा दर आहे. लवंगी मिरची 17000 ते 18 हजार रुपये पर्यंतचा दर आहे.
जरी मिरचीला दर असला तरी शेतकऱ्यांच्या मिरची उत्पन्नात घट झाल्यामुळे शेतकरी वर्गाला त्याचा चांगलाच फटका बसला.