ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

CBI | बाप रे! ‘ही’ सरकारी बँक करणार 600 शाखा बंद, खातेदारांच्या पैशाचं काय? कारण जाणून त्वरित करा खाते चेक

आपल्या कमाईतून थोडेफार पैसे बचत करून ग्राहक बँकेत खाते काडून त्यावर ठेवतात. जेणेकरून त्यांची रक्कम बँकेत सुरक्षित राहते आणि बँक ग्राहकांना ( Customers) काही प्रमाणात त्यावर व्याजही देते.

CBI | त्यामुळे प्रत्येकजण आपल्या पैशांची गुंवणुक (Investment of money) किंवा ठेव बँकेत ठेवणे पसंत करतो. जेणेकरून त्याबाबत कोणतीच चिंता राहू नये. मात्र, अनेकदा असेही पाहायला मिळते की, ग्राहकांनी आपली बचत व एखाद्या बँकेत खाते (Bank account) काढले असेल अन् त्या बँकेची शाखाच (Bank branch) बंद पडली. असे झाल्यास ग्राहकांना प्रचंड चिंता सतावते. खर तर, हे स्वाभाविकच आहे. असाच धक्कादायक प्रकार आता एका आघाडीवर असलेल्या बँकेच्या बाबतीत घडण्याची शक्यता आहे. ज्यामुळे ग्राहकांवर आता चिंतेत पडण्याची वेळ येणार आहे.

‘ही’ बँक करणार शाखा बंद?
सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India ) ही एक आघाडीची बँक आहे. अनेक ग्राहक बँकेवर विश्वास ठेवतात. तुम्हीही त्यापैकीच एक असाल तर ही धक्कादायक बातमी तुमच्यासाठीच आहे. होय, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने आता आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात तिच्या शाखा बंद करण्याचा विचार करत आहे.

वाचा: LIC | LIC च्या IPO ची ठरली तारीख : ज्याची पॉलिसी त्यालाच डिस्काऊंट अन् गुंतवावी लागणार फक्त ‘इतकी’च रक्कम…

सेंट्रल बँक ऑफ इंडिया करणार तब्बल 600 शाखा बंद?
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या देशभरात जवळपास 4594 इतक्या शाखा आहेत. परंतु, आर्थिकरित्या ही बँक तोट्यात जात असल्याने बँक मार्च 2022 पर्यंत यापैकी 600 शाखा बंद करण्याचा विचार किंवा शाखेचे विलिनीकरण करत आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पीसीए यादीत समावेश
सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) त्वरित सुधारात्मक कृती (PCA) या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. म्हणजेच या यादीत वाईट स्थितीतून जाणाऱ्या बँकांचा उल्लेख केला जातो. त्याचवेळी 12 बँकांना या यादीत टाकण्यात आले होते व त्यांना त्वरित ही स्थिती सुधारण्याची संधी दिली होती. ज्यात 11 सरकारी आणि 1 खाजगी बँकांचा समावेश होता. तर त्याचवेळी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा या यादीत अद्यापही समावेश आहे, तर इतर 11 बँकांना यातून काढून टाकण्यात आले. ज्याचं कारण म्हणजे या बँकेची आर्थिक स्थिती कसलेच सुधारली नाही. आता याच कारणामुळे ही बँक देशभरातील जवळपास 13 टक्के शाखा बंद करण्याचा विचार करत आहे.

वाचा: SBI | स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांच्या इंटरनेट सुरक्षतेसाठी आणली मार्गदर्शक तत्त्वे, न पाळणाऱ्या ग्राहकांचे होणार नुकसान

आरबीआयचा रेपो रेट
देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढत आहे. त्याचमुळे आरबीआयने आपल्या रेपो रेटमध्ये (Repo rate) 0.40 टक्के वाढ केली आहे. नंतर रेपो रेट आता 4.40 टक्क्यांवर पोहोचला आहे. पतधोरण समितीच्या तातडीच्या बैठकीत 2 व 3 मे 2022 रोजी रेपो रेट वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. रेपो रेट वाढल्यामुळे आता ग्राहकांच्या कर्जाचा ईएमआय देखील वाढणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँपवर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button