शेळीपालन हा शेतीचा एक प्रमुख शेतीपूरक उद्योग आहे. शेळी पालनातून शेतकऱ्याला बऱ्यापैकी आर्थिक नफा मिळतो, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे शेळीपालनासाठी जागाही पुरेशी उपलब्ध असते त्यामुळे ग्रामीण भागातील सीमांत शेतकरी शेळीपालनाचा व्यवसाय करू शकतात. त्यासाठी जास्त पैसे गुंतवण्याचीही गरज नाही. कमी गुंतवणुकीमध्ये ही शेतकरी हा व्यवसाय करू शकतात.
शेळी पालन आता बंदिस्त प्रकारचे ही करत आहेत परंतु त्यापेक्षा पारंपरिक पद्धतीने केलेले शेळीपालन शेळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील महत्वाचे असते. शेळीपालनासाठी काही तांत्रिक गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना माहिती असली कि त्यांना शेळीपालनामधून आणखी जास्त नफा मिळवता येतो, कोणत्या तांत्रिक गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना पाहिजे यामध्ये,
- शेळी पालनाचे व्यवस्थापन कसे करावे
- शेळीपालनामधून खरंच नफा मिळतो का
- शेळी पालनासाठी कोणत्या जातींची निवड करावी
- शेळ्यांना रोग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी
- करड्यांचे पालन कसे करावे त्यांची काळजी कशी घ्यावी
- शेळ्यांच्या गोठा म्हणजे निवारा कसा असायला हवा
या सर्व बाबींची शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती असेल तर शेतकऱ्यांच्या नफ्यामध्ये आणखी भर पडेल, शेळीपालनासाठी निवड करताना कोणत्या जातींची निवड करायला हवी ,महाराष्ट्रातील शेळ्यांचे वैशिष्टयांची माहिती
महाराष्ट्रातील एकूण शेळ्यांच्या जाती
- उस्मानाबादी शेळी
- संगमनेरी शेळी
- सुरती खान्देशी / निवानी
- कोकण कन्याळ
१. उस्मानाबादी शेळी
शारिरीक गुणधर्म :
- रंग : प्रामुख्याने काळा
- कान : लोंबकळणारे
- शिंगे : मागे वळलेली
- कपाळ : बर्हिवक्र
- उंची : ६५ ते ७० सें.मी.
- छाती : ६५ ते ७०सें. मी.
- लांबी : ६० ते ६५ सें.मी.
वजने :
- जन्मतः वजन : २.५ किलो
- पूर्ण वाढ झालेल्या शेळीचे वजन. : ३० ते ३५ किलो
- पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचे वजन : ४५ ते ५० किलो
पैदाशीचे गुणवैशिष्टये :
- वयात येण्याचा काळ : ७ ते ८ महिने
- प्रथम गाभण राहतांनाचे वय : ८ ते ९ महिने
- प्रथम विण्याचे वय : १३ ते १४ महिने
- दोन वितामधील अंतर : ८ ते ९ महिने
- नर-मादी करडांचे जन्माचे प्रमाण. : १ : १
- ऋतुचक्र (पुन्हा माजावर येण्याचा काळ) : २० ते २१ दिवस
२. संगमनेरी शेळी
शारिरीक गुणधर्म :
- रंग – संगमनेरी शेळयामध्ये पांढरा (६६%) पांढरट तांबडा आणि तांबडा (१६%) रंग आढळतो.
- नाक – तांबडे, काळा रंग आढळतो.
- पाय – काळे, तांबडा रंग आढळतो.
- शिंग – अंदाजे ८ ते१२% शेळया हया बिनशिंगी (भुंडया) आढळतात, उर्वरित
- शेळयांमध्ये शिंगे आढळतात. शिंगाचा आकार, सरळ, मागे वळलेली आढळतात
- कान – कान प्रामुख्याने लोंबकळणारे परंतु काही शेळयामध्ये उभे किंवा समांतर आढळतात.
- कपाळ – प्रामुख्याने बर्हिवक्र आणि सपाट.
- दाढी- संगमनेरी शेळयांमध्ये अगदी तुरळक प्रमाणात दाढी आढळते.
- शेपटी – शेपटी बाकदार आणि सरासरी लांबी १८.४६+०.२५ सेमी आढळते.
- स्तन – गोलाकार (४२%), वाडग्यासारखे (२५%), लोंबकळणारे (२२%) आढळतात.
- स्तनाग्रे गोलाकार आणि टोकदार आढळतात.
पैदाशीचे गुणवैशिष्टये :
- वयात येणे (दिवस)- २४५
- प्रथम माजावर येण्याचे वय ( दिवस)- २४८
- प्रथम गाभण जाण्याचे वय (दिवस )-२८७
- प्रथम विताचे वय (दिवस ) – ४३२
- माजाचा कालावधी (तास) – ४१.७३
- दोन माजांमधील अंतर- २३.८८
- दोन वेतांमधील अंतर (दिवस)-२३.८८
- जन्मणा-या करडांची टक्केवारी-१.६२
- जन्मणा-या करडांची टक्केवारी १. एक- ४२.२५% २. जुळे- ५४.२३% ३. तिळे- २.८१% ४. चार- ०.७०%
- दूध- ८० लिटर्स दूध उत्पादन ९० दिवसाच्या वेतामध्ये आढळते.
३. सुरती खान्देशी / निवानी
शारिरीक गुणधर्म :
- रंगः पांढरा
- कानः लांबट आणि रुंद कासः चांगली मोठी
- दुध उत्पादन : दररोज एक ते दिड केलो आणि एका विताच्या हंगामात एकूण १२० ते १५० किलो
- वास्तव्य : गुजरातमध्ये आणि धुळे ,जळगांव जिल्ह्यांमध्ये
वजने :
- जन्मतः वजन : २.५ किलो
- पूर्ण वाढ झालेल्या शेळीचे वजन: २५ ते ३०किलो
४. कोकण कन्याल
स्थान :कन्याल जातीच्या शेळ्या ह्या कोकणातील(मुंबई विभाग) समुद्ग किनारी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतात. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, लिल्हा म्हणून ह्या प्रसिध्द आहे. आणि त्या भौगोलिक हवामानामध्ये ह्या शेळ्या वाढतात हे त्यांचे खास वैशिष्ट्ये आहे. कोकण कन्याल शेळी हे कोकणाचे भुषण आहे. कोकण कन्याल शेळीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाण
शारिरीक गुणधर्म :
- रंगः- वरच्या जबड्यावर पांढरा रंगचे पट्टे आढळतात.
- पायः- लांब, पायावर काळा पांढरा रंग आढळतो. पाय लांब आणि मजबूत असल्यामुळे शेळ्या चारा खाण्यासाठी टेकड्यावर चढू शकतात.
- कातडीः- कातडी मुलायम आणि गुळगुळीत असल्यामुळे शरीरावर पडणा-या पावसाच्या पाण्याचा चटकन निचरा होतो. शरीरावर छोटे केस आढळतात.
- डोक :- नाकापासून कानापर्यंत दोन्ही बाजूस पांढरे पट्टे आढळून येतात.
- कपाळः- काळ्या रंगाचे, चपटे आणि रुंद असते.
- कान्:- काळा रंग आणि पांढ-या रंगाच्या कडा, चपटे लांब आणि लोंबणारे असतात.
- शिंगेः- टोकदार, सरळ आणि मागे वळलेली आढळतात.
- नाकः- स्वच्छ आणि रुंद आढळतात.
वजने :
जन्मतः वजन १.७६ ते २.१९ सरासरी १.१९ कि.
लिंग शारीरीक वजन (कि) उंची (सेमी) छातीचा घेर (सेमी) लांबी (सेमी)
बोकड ५२.५७ ८३.०० ९०.० ८४.००
शेळी ३२.८३ ६८.६ ७४.०० ७१.००
उस्मानाबादी शेळी मांस उत्पादनासाठी, तर संगमनेरी शेळी दूध आणि मांसासाठी चांगली आहे. कोकण कन्याळ ही नवीन सुधारित जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे.
ही जात मांसउत्पादनासाठी चांगली आहे. एक ते दीड वर्षाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा 53 टक्के आहे. एका वर्षामध्ये या जातीच्या नराचे 25 किलो आणि मादीचे 21 किलो वजन भरते. करडाचे तीन महिन्यांच्या वाढीपर्यंतचे वजन नऊ किलो, तर सहा महिने वाढीचे वजन 14 ते 15 किलो असते. पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचे सरासरी 50 किलो, तर शेळीचे वजन 32 किलोंपर्यंत भरते. ही शेळी 11 व्या महिन्यात प्रजननक्षम होऊन माजावर येते आणि 17 व्या महिन्यात पहिले वेत देते. जुळे देण्याचे प्रमाण 40 टक्के आहे. दोन वेतांतील अंतर आठ महिने असून, शेळी दोन वर्षांत तीन वेत देते. प्रत्येक वेतामध्ये साठ लिटर दूध देते. दुधाचा कालावधी 97 दिवसांचा आहे. भाकड काळ हा 84 दिवसांचा आहे. ही जात स्थानिक जातीपेक्षा काटक आहे.
ज्या शेळ्यांचे डोळे पाणीदार व तेजस्वी आहेत अश्या शेळ्यांची निवड दूध उत्पादनासाठी करावी. तसेच छाती रुंद भरदार व मान लांब व उंच असावी.कास मोठी, दोन्ही सडांची लांबी सारखी असावी. कास दोन्ही पायांच्या मध्ये किंचित मागच्या बाजूला उंचावलेली असावी.
सरासरी वजनापेक्षा (35 ते 40 कि. ग्रॅ.) थोडे जास्त वजन असणाऱ्या शेळ्याची मास उत्पादनासाठी निवड करावी. शेळ्यांचे पाय सरळ, मजबूत व दोन पायांत भरपूर अंतर असावे,पाठ सरळ व रुंद असावी, छाती भरदार व रुंद असलेल्याच शेळ्यांची निवड करावी.
E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: