खेळ कुणाला दैवाचा कळला जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर आईचा कोरोनामुळे मृत्यू…
Game Who knew the fate of the mother died of corona after giving birth to twins
कोरोनामुळे संपूर्ण जगाची घडी विस्कळीत झाली आहे फक्त आर्थिक बाबीवर याचा परिणाम झाला नाही तर कोरोनामुळे घर, परिवारामधील घडी विस्कळीत झाली कोणाच्या घरातील गेले आजोबा,तर कोणाच्या घरातील गेला घराचा आधारस्तंभ, तर कोणाचा भाऊ तर कोणाची बहीण, तर कोणाची माय, कोरोनामुळे संपूर्ण महाराष्ट्रला हृदय हेलावून टाकणारी घटना पुणे येथे काल घडली,
पुणे येथील एका महिलेने दोन गोंडस मुलीला जन्म दिला आणि एका दिवसाच्या आतमध्ये कोरोना ने तिच्यावर घाला घातला आणि त्या दोन गोंडस मुली कायमच्या मातृ सुखापासून दुरावल्या गेल्या….
पिंपरी चिंचवड येथे ही महिला वायसीएम रुग्णालयात प्रसुती करण्याकरता हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आली होती. चार एप्रिल रोजी त्या महिलेला त्रास जाणवू लागल्यामुळे कोरोना टेस्ट ( covid test) करण्यात आली ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्याकारणाने घरातील प्रत्येक व्यक्तीला हुरहूर वाटू लागली होती. म्हणून पाच एप्रिल रोजी सिजरियन पद्धतीने ऑपरेशन करण्यात आलं. सुदैवाने दोन्ही जुळ्या मुलींची टेस्ट निगेटिव्ह आली परंतु त्या दोघी मात्र कायमच्या मातृप्रेमापासून पासून दूर झाल्या…
कोरोनचा काळ ( covid-19) हा अत्यंत संवेदनशील काळ आहे. यामध्ये प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. गर्भवती महिलांनी( Pregnancy) देखील अतिरिक्त काळजी घ्यायला हवी