ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Bank Loan | शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून मिळणार थेट पीककर्ज; जाणून घ्या ५० लाखांपर्यंत कसे मिळेल कर्ज?

Bank Loan | जळगाव जिल्हा सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँकेने अनिष्ट तफावतीची रक्कम ५० लाखांच्या आत असलेल्या विकास सोसायटींच्या कर्जदार सभासदांना थेट पीक कर्ज (Bank Loan) पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काही सोसायटींचे सचिव या निर्णयात अडथळा आणत आहेत आणि शेतकऱ्यांना दिशाभूल करत आहेत, अशी माहिती जिल्हा सेंट्रल को-ऑपरेटिव्ह स्टाफ युनियनने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

बँकेने याबाबत स्पष्टीकरण केले आहे की, अनिष्ट तफावतीमुळे अनेक विकास सोसायटी कर्जपुरवठा करण्यास असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे या सोसायटींच्या कर्जदार सभासदांना पीककर्जापासून वंचित राहू नये यासाठी बँकेने थेट कर्जपुरवठा सुरू केला आहे. हा निर्णय शेतकरी हितासाठी घेण्यात आला आहे आणि कोणत्याही शेतकऱ्याला कर्जापासून वंचित राहू दिले जाणार नाही, असे बँकेने स्पष्ट केले आहे.

वाचा: विमा कंपन्यांना खरीप पीक विमा योजनेत 100% भरपाई देण्याची सक्ती! पण कंपनीचा निर्णयाला विरोध, शेतकऱ्यांना मिळणार का पैसे?

राज्यातील इतर अनेक जिल्हा बँकाही मागील पाच वर्षांपासून याच पद्धतीने कर्जपुरवठा करत आहेत. यामुळे संबंधित विकास संस्थांच्या थकबाकी वसुली होत असल्याने त्यांचे अनिष्ट तफावतीचे प्रमाण कमी होत आहे आणि काही संस्था अनिष्ट तफावतीतून बाहेर पडण्यास यशस्वी ठरल्या आहेत.

जिल्हा सेंट्रल को-ऑपरेटिव्ह स्टाफ युनियनचे सचिव सुनील दत्तात्रेय पवार यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विकास सोसायटींच्या अनिष्ट तफावतीमध्ये वाढ होण्यास मुख्यत्वे संबंधित संस्थांच्या सचिवांची भूमिका जबाबदार आहे. हे सचिव नेहमीच बँकेशी असहकार्य करतात आणि अनेक अडथळे निर्माण करतात. यामुळे बँकेचा एनपीए वाढतो आणि शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळत नाही.

वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ८२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात १३ कोटी रुपये जमा, तुम्हाला मिळाले का?

युनियनने बँकेच्या कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे की, ते विकास संस्थांच्या कर्जदार सभासदांना थेट कर्जपुरवठा करण्यास सक्षम आहेत आणि कोणत्याही शेतकऱ्याला कर्जापासून वंचित ठेवले जाणार नाही. सचिवांनी शेतकऱ्यांना दिशाभूल करू नये आणि बँकेच्या निर्णयाचा योग्य तो लाभ घ्यावा, असे आवाहन युनियनने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button