ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Yojana | ‘या’ समाजातील महिलांसाठी महिला स्वयंसिद्धी योजनेला मंजुरी, जाणून घ्या योजना आणि पात्रता

महिलांच्या आर्थिक विकासासाठी उन्नतीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून महिला स्वयंसिद्धी योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Yojana | या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सुरुवात झाल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी दिली आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण (OBC Social Reservation) गेले आहे. त्याचवेळी ओबीसी समाजातील महिलांच्या विकासासाठी (Women Development) राज्य शासनाच्या माध्यमातून 7 जून 2022 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन ओबीसी समाजातील (OBC Society) 50 टक्के महिला बचत गटांमधील महिलांकरता 5 ते 10 लाख रुपये कर्जावर 12 टक्केपर्यंत व्याज माफी देण्यासाठीचा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय (Government decision) घेऊन राज्यांमध्ये महिला स्वयंसिद्धी योजना (Mahila Swayam Siddhi Yojana) ही योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

काय आहे योजनेचा उद्देश?
महराष्ट्रातील महिला बचत गटातील इतर मागास प्रवर्गातील महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेद्वारे महिलांना व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात मदत केली जाणार आहे. या बचत गटातील महिलांनी वस्तूंचे उत्पादन, प्रक्रिया, मूल्य आधारित उद्योगासाठी बँकामार्फत मंजूर करण्यात आलेल्या 5 ते 10 लाखांपर्यंतच्या कर्जावर 12% व्याजाच्या मर्यादित व्याज परतावा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

वाचा: Wheat | भारतीय गव्हात रुबेला विषाणू असल्याचा तूर्किचा आरोप, जाणून घ्या रुबेला विषाणू आहे तरी काय?

काय आहे अटी व पात्रता?
• या योजनेसाठी अर्जदार महिला बचत गटातील महिला इतर मागासवर्गीय प्रवर्गातील असावी.
• अर्जदार महिला महाराष्ट्रीयन असावी.
• पात्र महिलाचे किमान वय 18 आणि कमाल वय 60 वर्षे असावे.
• महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचत गटात किमान 50 % इतर मागास प्रवर्गातील ( OBC )महिला असावी.

वाचा: Vehicle Parking | ‘अशा’ गाडीचा फोटो पाठवा अन् 500 रुपये मिळवा, गडकरींची नागरीकांना अनोखी ऑफर

योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक?
• महिला अर्जदाराला सक्षम अधिकाऱ्याने निर्गमित केलेला इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला.
• अर्जदाराच्या वयाचा पुरावा.
• रहिवासी दाखला.
• बचत गटाचे बँक पासबुक झेरॉक्स.
• बचत गटातील महिला सदस्यांचे CMRC कडून प्रमाणित कौटुंबिक उत्पादनाबाबत प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणापत्र.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button