योजना

Yojana | शेतकऱ्यांनो सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर मिळतय 50% अनुदान

मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत (Financial aid) करण्यासाठी अनेक योजना (Yojana) देत आहे.

Yojana | पीएम किसान (PM Kisan Yojana) अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6000 रुपये जमा केले जातात. शेतकऱ्यांना शेतीसाठी (Agriculture) अनेक प्रकारच्या यंत्रांचीही (Instrument) गरज असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान (Central Government Tractor Purchase Grant) देत आहे. ‘पीएम किसान ट्रॅक्टर योजने’ (PM Kisan Tractor Scheme) अंतर्गत हे अनुदान दिले जात आहे. चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊयात.

पीएम किसान ट्रॅक्टर योजना
खर तर, शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी ट्रॅक्टर अत्यंत आवश्यक आहे. मात्र देशात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे ट्रॅक्टर नाही. अशा भीषण परिस्थितीत त्यांना ट्रॅक्टर भाड्याने किंवा बैलांचा वापर करावा लागतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे. पीएम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर दिले जातील.

वाचा: Poultry Farming | कुक्कुटपालन अनुदानासाठी अर्ज सुरू, लाभार्थ्यांना मिळणार ‘इतके’ अनुदान

शेतकऱ्यांना मिळणारं 50% अनुदान
केंद्र सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान देते. याअंतर्गत शेतकरी कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर अर्ध्या किमतीत खरेदी करू शकतात. उर्वरित निम्मी रक्कम सरकार अनुदान म्हणून देते. याशिवाय अनेक राज्य सरकारही त्यांच्या स्तरावर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर 20 ते 50 टक्के सबसिडी देते.

वाचा: Vehicle Parking | ‘अशा’ गाडीचा फोटो पाठवा अन् 500 रुपये मिळवा, गडकरींची नागरीकांना अनोखी ऑफर

कसा घ्याल योजनेचा लाभ?
हे अनुदान सरकार फक्त 1 ट्रॅक्टर खरेदीवर देईल. तुम्हालाही योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणून शेतकऱ्याकडे आधार कार्ड, जमिनीचे कागद, बँक तपशील, पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी जवळच्या कोणत्याही CSC केंद्राला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button