ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

शेतीसोबत पूरकव्यवसाय करणे झाले सोप्पे ! सरकार कडून जनावरे वाटपासोबत मिळणार आता ‘या’ पायाभूत सुविधांसाठी अनुदान …

राज्यातील बहुतेक शेतकरी शेतीसोबत पूरकव्यवसाय करत असतात. यामध्ये शेळीपालन, पशुपालन, कुक्कुटपालन यांसारख्या व्यवसायांचा समावेश होतो. हे पूरक व्यवसाय ( Side buisness) केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते. दरम्यान असे व्यवसाय करण्यासाठी सरकार सुद्धा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत.

पायाभूत सुविधा नसल्यास योजनेचा लाभ घेता येत नाही

शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळावी यासाठी सरकार विविध योजना व अनुदाने जाहीर करते. पशुसंवर्धन विभागाकडून अनेकदा या व्यवसायांसाठी जनावरे व पक्षी वाटप केले जातात. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांकडे निवाऱ्याची सोय (Shelter) नसते यामुळे पर्यायाने त्यांना योजनेचा लाभ घेता येत नाही.

वाचा: खुशखबर ! शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर मिळणार जमीन ; जाणून घ्या, काय आहे योजना ?

पशुसंवर्धन विभाग व मनरेगा विभाग अभिसरण

या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या योजना आणि मनरेगा विभागाच्या योजना यांचे अभिसरण करण्यात आलेले आहे. यामुळे शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाच्या योजना आणि मनरेगा (Manrega) कडून मिळणाऱ्या योजनांचा एकत्रित लाभ घेता येणार आहे.

मिळणार या सुविधा

पशुसंवर्धन विभागाकडून गाई, म्हैशी, मेंढी, शेळी किंवा कुक्कुट पक्षांचे वाटप आणि मनरेगा कडून यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची (Basic needs ) निर्मिती करण्यात येईल. यामध्ये निवारा शेड, वैरण, औषधे यांचा समावेश असेल. यामुळे शेतकऱ्यांना यशस्वी पूरक व्यवसाय उभारणीसाठी मदत होणार आहे.

शासनाकडून मंजुरी

पशुसंवर्धन विभागाच्या योजना आणि मनरेगा विभागाच्या योजना यांच्या अभिसरणासाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. मागील महिन्याच्या शासन निर्णयामध्ये याचा समावेश आहे. याआधी शरद पवार ग्रामीण विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसायांसाठी मदत केली जात होती.

Animal husbantry department and manrega will work togather

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button