ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Spam calls | ‘या’ नंबर वरून कॉल येतायत तर सावधान ! होऊ शकते मोठी फसवणूक ; वेळीच घ्या ‘ही’ काळजी

Spam Calls | जग जितक्या वेगाने तंत्रज्ञानात ( technology) प्रगती करत आहे, तितक्याच वेगाने तंत्रज्ञान वापरताना येणारे धोके वाढत आहे. आजकाल सायबर गुन्ह्यांची संख्या कमालीची वाढताना दिसत आहे. आपण खूपदा ऑनलाइन फसवणुकींच्या ( online fraud) घटनांबाबत ऐकत असतो. बऱ्याचदा आपल्याला सुद्धा फसवणूकीचे कॉल येतात. सध्या एक नवीन फसवणुकीचा प्रकार आला आहे.

आंतरराष्ट्रीय नंबर वरून येणारे कॉल

तुम्हाला +84, +62, +60 आणि इतर वेगळ्या क्रमांकांनी सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नंबरवरून whatsapp वर कॉल येत असतील, तर असे कॉल उचलू नका. किंवा असे कॉल आल्यानंतर तो नंबर एका क्षणाचाही विलंब न करता ब्लॉक करा. (calls from international numbers)

व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फसवणूक

सध्या लोकांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फसवणूक करण्याचा नवा मार्ग शोधला आहे. फसवणूकीसाठी व्हॉट्सअॅपच्या या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर याआधी सुद्धा बऱ्याचदा झाला आहे. कारण, व्हॉट्सअॅपच्या मार्फत लोकांपर्यंत सहज पोहोचणे शक्य होते तसेच व्हॉट्सअॅपचे युजर्स देखील मोठ्या संख्येने आहेत.

ऑनलाइन फसवणुकीचा एक नवीन प्रकार

बहुतांश व्हॉट्सअॅप युजर्सच्या तक्रारीनुसार, त्यांना मलेशिया, केन्या आणि व्हिएतनाम, इथोपिया यांसारख्या देशातून कॉल्स येत आहेत. मात्र हे मिस कॉल्स का येतात ? हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. मात्र हा ऑनलाइन फसवणुकीचा एक नवीन प्रकार आहे. यासाठी काही लोक खास नवीन सिमकार्ड सुद्धा खरेदी करत आहेत.

जर तुम्हाला सुद्धा व्हॉट्सअॅपवर फसवणूक करणारे कॉल्स येत असतील, तर अजिबात घाबरु नका.

१) सर्वात अगोदर कॉल करणाऱ्याला व्हॉट्सअॅपवर रिपोर्ट करा. (REPORT)
२) त्यानंतर हा नंबर ब्लॉक करा. ( Block)
२)या नंबरवरुन येणाऱ्या मेसेजवरील कोणतीही लिंक किंवा व्हिडीओ ओपन करु नका.

बऱ्याचदा अशा लिंकवर तुमचा डेटा किंवा तुमचे पासवर्ड, पैसे चोरण्याचा कोणत्याही प्रकारचा मॅलवेयर असू शकतो. तुम्हाला फसवण्यासाठी व्हॉट्सअॅप कॉलवर काहीही करून तुमची फसवणूक केली जाऊ शकते. म्हणून, युजर्सना अनोळखी कॉलरपासून सावध रहायला हवे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Fraud calls on whatsapp from other countries

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button