योजना

Agriculture Subsidy| काय सांगता? मळणी यंत्रासाठी मिळतं अनुदान; शेतकऱ्यांनो, जाणून घ्या योजना

Agriculture subsidy| केंद्र शासनाचं एक उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं. त्यासाठी केंद्रानं अनेक पावलं उचलली आहेत. त्यापैकी एक म्हणजे पारंपारिक शेतीतून शेतीच्या यांत्रिकीकरणाकडे जाणं. यासाठी केंद्रानं कृषी यांत्रिकीकरण योजना अशी योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. मात्र केंद्राकडून शेतकऱ्यांच्या मागणीच्या प्रमाणात कृषी अवजारांचा पुरवठा होताना दिसत नाही. तसेच यातून मिळणाऱ्या निधीतही घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 18 मे 2018 रोजी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेतूनच मळणी यंत्रासाठीही (Thresher) अनुदान देण्यात येतं.

वाचा: बाप रे! मगरीच्या तोंडात जाऊनही माणूस जिवंत, तुम्हीच पाहा विश्वास न बसणारा व्हिडिओ

काय आहे योजना

महाराष्ट्र राज्यात जवळपास 80 टक्के शेतकरी हे अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. सहाजिकच त्यांचं उत्पन्नही जेमतेमच आहे. त्यामुळे इतक्या उत्पन्नात यंत्रांच्या साहाय्यानं शेती करणं त्यांना शक्य होत नाही. तसेच वेळेवर मजूरही उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्रास हा अशा शेतऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेला असतो. त्यामुळे हा त्रास कमी व्हावा यासाठी सरकार त्यांना अनुदानं आणि अनेक सवलती देत असतं. असंच अनुदान राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून त्यांना मिळणार आहे. तेही मळणी यंत्रासाठी. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला शेतकरी आणि अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेत 50 टक्के अनुदान मिळतं तर उर्वरित शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान मिळतं. मळणी यंत्राच्या अनुदानात त्या यंत्राच्या ताकदीनुसार बदल होतो.

इतकं मिळणार अनुदान (Subsidy)

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला शेतकरी, अनुसूचित जाती व जमाती यांसाठी पुढीलप्रमाणे अनुदान देण्यात येतं.

  • चार टन प्रति टना पेक्षा जास्त क्षमता असलेल्या व 35 बीएचपी (BHP) पेक्षा जास्त असलेल्या मळणी यंत्राला दोन लाख 50 हजार रुपये इतकं अनुदान मिळतं.
  • चार टन प्रती तासापेक्षा कमी क्षमता असलेल्या मळणी यंत्राला 80 हजार रुपये इतका अनुदान दिले जाते

वाचाही’ अट रद्द करा अन्यथा… कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी, अनुदानाच्या लाभात येताहेत अडचणी

आवश्यक असणारी कागदपत्रे (Documents)

या योजनेचा लाभ हवा असल्यास पुढील कागदपत्रांची आवश्यकता असते. आधार कार्ड, सातबारा व 8 अ उतारा, जातीचा दाखला, बँक पासबुक, यंत्राचे कोटेशन, यंत्राचा परीक्षण अहवाल.

असा करा अर्ज

हा अर्ज महाडीबीटी फार्मर स्कीम (Mahadbt farmers scheme) या वेबसाईटवर करता येतो. या वेबसाईटवर सुरुवातीला ‘शेतकरी योजना'(Farmers scheme) हा पर्याय निवडून वैयक्तिक लाभार्थी या ऑप्शनवर जाऊन हा अर्ज करता येतो.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button