Milk meter in Dairy| लूट थांबणार? दूध संकलन केंद्रांना लगाम, राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय
Milk meter in dairy| शेतकरी आणि लूट यांचं नातं अतूट आहे. शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो अपूराच पडतो. आता हेच पहा ना! शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करत असतात. पण इथेही त्यांची लूट थांबत नाही. दूध डेअऱ्यांमध्ये किंवा दूध संकलन केंद्रांमध्ये (Milk collection centers) फॅट आणि एसएनएफ (SNF) मोजण्यासाठी मिल्कोमीटर हे यंत्र वापरलं जातं. या यंत्रात चुकीचं सेटिंग करून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली जाते. त्यांना लुटलं जातं. इतकंच नाही तर वजनातही काटा मारला जातो. मात्र आता राज्य सरकारने एक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दूध संकलन केंद्रांवर होणारी लूट थांबण्यास मदत होणार आहे.
वाचा: बाप रे! मगरीच्या तोंडात जाऊनही माणूस जिवंत, तुम्हीच पाहा विश्वास न बसणारा व्हिडिओ
काय आहे निर्णय
या लुटीविरोधात किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने लढा सुरू केला होता. आता त्याला यश मिळताना दिसत आहे. या दोन्ही संघटनांनी दूध केंद्रांवर प्रमाणित केलेले मिल्कोमीटर (Milkometer) वापरण्याची मागणी केली होती. ती सरकारने मान्य केली आहे आणि असा निर्णय घेतला आहे की वजन काटे व मिल्को मीटर यांचे शासकीय यंत्रणेमार्फत नियमित प्रमाणीकरण व तपासणी करावी लागणार आहे. दूध संकलन केंद्रांवर हा नियम बंधनकारक करण्यात आला आहे.
किसान सभेने काढला होता मोर्चा
मध्यंतरी नाशिक ते मुंबई दरम्यान किसान सभेने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. या मोर्चा दरम्यान दूध संकलन केंद्रांवर मिल्को मीटर बसवण्याची व त्याचे प्रमाणीकरण करण्याची मागणी केली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ही मागणी मान्य करण्यात आली. अखिल भारतीय किसान सभेचे केंद्रीय सहसचिव डॉ. अजित नवले यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
वाचा: ही’ अट रद्द करा अन्यथा… कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी, अनुदानाच्या लाभात येताहेत अडचणी
अशी व्हायची लूट
दूध संकलन केंद्रात आणि एसएनएफ मोजण्यासाठी मिल्क टेस्टर मशीन वापरण्यात येते. मात्र काही दूध संस्थाचालक फायद्यासाठी हपापलेले. ते या मिल्क टेस्टर मशीन मध्ये विविध क्लृप्त्या वापरून सेटिंग करून घेतात जेणेकरून ती मशीन दुधाची योग्य फॅट दाखवणार नाही. तसेच वजन काट्याचेसुद्धा सेटिंग करण्यात येई. ज्यामुळे उत्पादकांना कमी पैसे द्यावे लागतील. फसवून खरेदी केलेलं तेच दूध दूधसंघांना विकून गब्बर होण्याच्या नादात असलेल्या दूध संस्था चालकांना आता लगाम लागणार आहे.
हेही वाचा:
- तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांची मिळणार नुकसान भरपाई, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा
- धक्कादायक, शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक, आधिकारी आणि व्याऱ्यांचे संगनमत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..