इतरताज्या बातम्याराशिभविष्य

Horoscope | या राशींच्या लोकांसाठी 31 दिवस असतील धोकादायक; संकट ओढविण्याचे लक्षणं, जरा जपून पाऊले टाका ..

सूर्याच्या प्रभावामुळे गुरूचा 19 फेब्रुवारीला कुंभ राशीत अस्त होईल, जो 20 मार्च 2022 पर्यंत या राशीत सामान्य स्थितीत येईल. ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology) 31 दिवस गुरू अस्तादरम्यान काही राशींनी काळजी घेणं आवश्यक आहे. गुरू अस्ताचे टायमिंग- हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, गुरूचा 19 फेब्रुवारी 2022 रोजी, शनिवारी सकाळी 11.13 मिनिटांनी कुंभ राशीत अस्त होईल. 20 मार्च 2022 रोजी, रविवारी सकाळी 09:35 वाजता त्याच राशीत उदय होईल.

या राशीच्या लोकांनी काळजी घ्या..

मेष– मेष राशीच्या लोकांनी या काळात काळजी घेणं आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागू शकते. कामानिमित्त तुम्हाला जबरदस्तीने प्रवास करावा लागू शकतो.

वृषभ- या राशीच्या लोकांना त्यांच्या कार्यात अडथळ्यांना सामोरं जावं लागू शकतं. कामाच्या ठिकाणी विचित्र आव्हानं येऊ शकतात.

मिथुन – मिथुन राशीच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. मात्र, या काळात तुम्हाला भागीदारी व्यवसायात काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. ज्याचा आपल्या व्यवसायावर परिणाम होईल.

कर्क– या काळात तुम्हाला काही कामात अडथळे येऊ शकतात. कामे पूर्ण होण्यास जास्त वेळ लागू शकतो.

सिंह– सिंह राशीच्या लोकांचे त्यांच्या प्रियजनांशी किंवा वरिष्ठांशी संबंध बिघडू शकतात. तुमच्या प्रतिमेवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

कन्या- नोकरदार लोकांवर कामाचा ताण येऊ शकतो. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना तोटा सहन करावा लागू शकतो.

तूळ– कामाच्या ठिकाणी कामात सहजता येईल. परंतु, या काळात तुमच्या वरिष्ठांशी तुमचे संबंध बिघडू शकतात. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत.

वृश्चिक– गुरू अस्ताच्या काळात तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. व्यावसायिक जीवनात काही समस्या असू शकतात, जसे की सहकाऱ्यांसोबत संबंध बिघडणे इ.

धनु – या काळात तुम्हाला मंद गतीने परिणाम मिळतील. नोकरी गमावण्यासारख्या परिस्थितीला सामोरं जावं लागू शकतं. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान दुखावला जाऊ शकतो.

मकर- गुरुच्या अस्ताच्या काळात तुम्हाला कौटुंबिक जीवनात समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. या दरम्यान तुमच्या वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. प्रोफेशनल लाइफमध्ये तुम्हाला जे अपेक्षित आहे ते तुम्हाला मिळणार नाही.

कुंभ- कुंभ राशीच्या लोकांना अपयशाला सामोरे जावे लागू शकते. या काळात तुमच्या व्यावसायिक जीवनात अडचणी येऊ शकतात. नोकरीत बदल संभवतो.

मीन– मीन राशीच्या लोकांना गुरु अष्टादरम्यान मानसिक दबावाचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुम्ही नफा-तोट्याच्या स्थितीत राहाल. कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल नाही.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button