ताज्या बातम्या

Buck on the moon | वडगाव बाजारात अठरा लाख रुपयांचा चांदावरचा बोकड! खरेदीदारांची मागणी सात लाख, व्यवहार झाला नाही

Buck on the moon | वडगाव, १६ जून: मुस्लिम धर्मियांसाठी येत्या सोमवारी (ता. १७) बकरी ईद असल्यामुळे आज वडगाव बाजार समितीमध्ये भरलेल्या बाजारात बकऱ्यांची मोठी गर्दी होती. या बाजारात अठरा लाख रुपयांचा डोक्यावर चांद असलेला वैशिष्ट्यपूर्ण देशी बोकड विक्रीसाठी आला होता. याला सात लाख रुपयांची मागणी झाली; परंतु त्याचा व्यवहार झाला नाही.

बाजारात बकऱ्यांची आवक जास्त आणि खरेदीदारांची संख्या कमी असल्यामुळे बकऱ्यांच्या दरात घट झाली आहे.

वाचा :Relief to farmers |कांद्याला भाव! शेतकऱ्यांना दिलासा, अनेक बाजारपेठेत 30 रुपयांपर्यंत दर! पहा आज चे बाजार भाव…

विविध जातींच्या बकऱ्या

या बाजारात बिटल, शिरुर, कवठेमहांकाळ, आटपाडी, कच्ची, अंडील अशा विविध जातींचे पालीव, बोकड विक्रीसाठी आले होते. याचा व्यापार करण्यासाठी व्यापारी आणि शेतकरी यांनी गर्दी केली होती.

रत्नागिरी, आटपाडी, मिरज, जत-माडग्याळ, सातारा, रहिमतपूर, पलूस अशा विविध भागांतून खरेदी-विक्रीसाठी शेतकरी आणि व्यापारी आले होते.

चांदावरचा बोकड

या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे बाजारात सर्वाधिक किमतीचा बोकड विक्रीसाठी आला होता. नामदेव तुकाराम आवळेकर (रा. बोमनाळ, ता. अथणी, जि. बेळगाव) यांनी पालन केलेला बोकड लोकांचे खास आकर्षण ठरला. तीन वर्षे वयाचा बोकड असून जवळपास पंच्याहत्तर किलो वजन आहे. या बोकडाच्या कपाळावर चांद असल्यामुळे त्याची किंमत अठरा लाख रुपये होती.

त्याला एका व्यापाऱ्याने सात लाख रुपयांची मागणी केली; परंतु व्यवहार झाला नाही. त्याची खास सोय असून वडगावच्या बाजारात विक्री न झाल्यास मिरज, कराड, मुंबईच्या बाजारात त्याला विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याचे सांगितले. मुंबईला त्याला चांगला दर मिळेल, अशी आशा आहे. त्याच्या मालकाने हलगीच्या तालावर त्याची बाजारातून मिरवणूक काढली होती.

वाहतूक विस्कळीत

या बाजारात बकरी ईदमुळे बकऱ्यांच्या विक्रीसाठी मोठी गर्दी झाली होती. यामध्ये लहान-मोठ्या वाहनांची संख्या जास्त होती. या वाहनांच्या अस्ताव्यस्ततेमुळे वाहतूक विस्कळीत होती. तासन्तास वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बाजार समिती कर्मचारी आणि पोलिस बघ्याची भूमिका बजावत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button